नवी दिल्ली, 22 डिसेंबर: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह (MS Dhoni) धोनीची मुलगी झीवा(Ziva Dhoni) एक लोकप्रीय स्टार डॉटर आहे. सोशल मीडियावर धोनी अॅक्टिव्ह नसला तर त्याची मुलगी आपले क्यूट फोटो शेअर करत सर्वांचे लक्ष वेधत असते. सध्या झीवाचा एक फोटो व्हायरल होत आहे. त्यामध्ये ती वडील महेंद्र सिंहसोबत स्विमिंग पूल मध्ये मस्ती करताना दिसली. झीवाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती मोनोकिनी ड्रेस परिधान करुन स्विमिंग पूल मस्ती करत आहे. तिने रेड आणि व्हाइट रंगाची प्रिंटेड मोनोकिनी परिधान केली आहे. झीवाने हा फोटो शेअर करत ‘हॉलीडे’ अशी कॅप्शन दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धोनी सध्या दुबई दौऱ्यावर आपल्या कुटूंबासोबत सुट्टी एन्जॉय करत आहे.
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीची मुलगी झीवाचा सोशल मीडियावर बराच मोठा चाहता वर्ग आहे. अनेकदा तिचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. काही दिवसांपूर्वी महेंद्र सिंह धोनीचा मुंबई एअरपोर्टवरील एक फोटो व्हायरल झाला होता. त्यामध्ये त्याने ब्लॅक कलरचा टी शर्ट परिधान केला आहे. त्याचा हा कूल लूक आणि फिटनेस पाहून चाहचे भलतेच चकित झाले होते.