जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL Final : विजयानंतर धोनी झाला भावुक, जडेजाला उचलून घेताच मिटले डोळे, झिवा बिलगली

IPL Final : विजयानंतर धोनी झाला भावुक, जडेजाला उचलून घेताच मिटले डोळे, झिवा बिलगली

विजयानंतर धोनी झाला भावूक

विजयानंतर धोनी झाला भावूक

धोनी जडेजाला उचलून घेतो. त्यावेळी काही सेकंदासाठी धोनी डोळे बंद करतो. धोनीने आपल्या भावना लपवण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतं.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

अहमदाबाद, 30 मे : एमएस धोनीने कर्णधार म्हणून आणखी एक विजेतेपद पटकावलं आहे. आयपीएल 2023च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने अखेरच्या चेंडूवर गुजरात टायटन्सला हरवलं. याआधी काही दिवसांपूर्वी धोनी आणि जडेजा यांच्यात वादाची बातमी समोर आली होती. फायनलमध्ये चेन्नईला अखेरच्या दोन चेंडूवर 10 धावा हव्या होत्या. जडेजाने वेगवान गोलंदाज मोहित शर्माला पाचव्या चेंडूवर षटकार मारला. त्यानतंर चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 214 धावा केल्या होत्या. तर पावसामुळे चेन्नईला 15 षटकात 171 धावांचे आव्हान मिळाले होते. आयपीएलने फायनलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. दोन मिनिटांच्या या व्हिडीओत रविंद्र जडेजाने चौकार मारताच चेन्नईचा संघ जल्लोष करताना दिसतोय. यावेळी जडेजा धोनीपर्यंत पोहोचतो आणि तेव्हा धोनी जडेजाला उचलून घेतो. त्यावेळी काही सेकंदासाठी धोनी डोळे बंद करतो. धोनीने आपल्या भावना लपवण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतं. तर जडेजाही हसत हसत धोनीची पाठ थोपटतो. ऋतुराजने सांगितलं आतापर्यंतचं सर्वात मोठं सिक्रेट, IPL जिंकताच पहिल्यांदा फोटो केला शेअर महेंद्र सिंह धोनीने विजेतेपद पटकावल्यानंतर गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याचीही गळाभेट घेतली. तसंच पांड्याची पत्नी नताशालासुद्धा भेटला. यावेळी धोनीची मुलगी झिवासुद्धा धोनीला येऊन बिलगली. धोनी यंदाच्या हंगामात आयपीएलमधून निवृत्ती जाहीर करेल अशी चर्चा होती. पण त्याने अद्याप असा विचार केला नसल्याचं म्हटलंय. चेन्नई सुपर किंग्जने या विजेतेपदासह मुंबईच्या विक्रमाची बरोबरी केली. दोन्ही संघांनी आतापर्यंत सर्वाधिक प्रत्येकी 5 विजेतेपदं पटकावली आहे. टी20 च्या इतिहासात आतापर्यंत एकूण 15 संघ सहभागी झाले आहेत. त्यापैकी फक्त 13 संघांपैकी 6 संघांनी विजेतेपद पटकावलंय. यातही दोन वेळा केकेआरने विजेतेपद पटकावलं तर राजस्थान, गुजरात, सनरायजर्स आणि डेक्कन चार्जर्स यांनी प्रत्येकी एकदा विजेतेपद मिळवलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात