मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /टायगर अभी जिंदा है! धोनीची विराटच्या क्लबमध्ये एन्ट्री, CSKचा पहिलाच असा फलंदाज

टायगर अभी जिंदा है! धोनीची विराटच्या क्लबमध्ये एन्ट्री, CSKचा पहिलाच असा फलंदाज

धोनीने आयपीएलच्या उद्घाटनाच्या सामन्यात अहमदाबादमध्ये गुजरातविरुद्ध 7 चेंडुत नाबाद 14 धावा केल्या. यात धोनीने एक षटकार आणि एक चौकार मारला.

धोनीने आयपीएलच्या उद्घाटनाच्या सामन्यात अहमदाबादमध्ये गुजरातविरुद्ध 7 चेंडुत नाबाद 14 धावा केल्या. यात धोनीने एक षटकार आणि एक चौकार मारला.

धोनीने आयपीएलच्या उद्घाटनाच्या सामन्यात अहमदाबादमध्ये गुजरातविरुद्ध 7 चेंडुत नाबाद 14 धावा केल्या. यात धोनीने एक षटकार आणि एक चौकार मारला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

अहमदाबाद, 01 एप्रिल : चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने आयपीएल 2023च्या पहिल्या सामन्यात मोठा विक्रम नोंदवला. धोनीने गुजरात टायटन्सविरुद्ध २०० च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. यात त्याने आयर्लंडचा वेगवान गोलंदाज जोशुआ लिटिलच्या चेंडूवर गगनचुंबी षटकार मारला. या षटकारासह आयपीएलमध्ये एका विक्रमाची नोंद धोनीने केली. आय़पीएलमध्ये कोणत्याही एका संघाकडून 200 षटकार मारण्याची कामगिरी धोनीने केली. अशी कामगिरी करणारा धोनी चेन्नईचा पहिलाच फलंदाज आहे. यासोबतच धोनीने विराटच्या क्लबमध्येही एन्ट्री केली.

धोनीने आयपीएलच्या उद्घाटनाच्या सामन्यात अहमदाबादमध्ये गुजरातविरुद्ध 7 चेंडुत नाबाद 14 धावा केल्या. यात धोनीने एक षटकार आणि एक चौकार मारला. धोनीने आय़पीएलमध्ये एका संघाकडून खेळताना 200 पेक्षा जास्त षटकार मारले. अशी कामगिरी करणारा तो आयपीएलमधील पाचवा फलंदाज आहे. तर आतापर्यंत आयपीएलमध्ये धोनीने एकूण 230 षटकार मारले आहेत.

IPL 2023 : Age is just a number, धोनीने असं काही केलं अख्खं स्टेडियम पाहातच राहिलं 

आयपीएलमध्ये कोणत्याही एका संघाकडून खेळताना 200 किंवा त्यापेक्षा षटकार मारणाऱ्या फलंदाजांमध्ये ख्रिस गेल, एबी डिविलियर्स, कायरन पोलार्ड आणि विराट कोहलीचा समावेश आहे. आरसीबीकडून गेलने 239 तर डिविलियर्सने 238 षटकार मारले आहेत. पोलार्डने मुंबई इंडियन्सकडून खेळताना 223 तर विराटने आरसीबीकडून 218 षटकार मारले आहेत.

धोनीने 20व्या षटकात तिसऱ्या चेंडूवर षटकार मारला. आयपीएलमध्ये 20 व्या षटकात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांमध्ये धोनी पहिल्या नंबरवर आहे. त्याने आय़पीएलमध्ये अखेरच्या षटकात आतापर्यंत 53 षटकार मारले आहेत. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर कायरन पोलार्ड असून त्याने 20व्या षटकात 33 षटकार मारले आहेत.

First published:
top videos

    Tags: CSK, IPL 2023, MS Dhoni