मुंबई, 31 मार्च : वय हा महेंद्र सिंह धोनीसाठी फक्त एक आकडा आहे. 41 वर्षांच्या धोनीने अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या आयपीएलच्या पहिल्या सामन्यात पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीचा जलवा दाखवून दिला. या सामन्यात गुजरात विरुद्ध एम एस धोनीची बॅट अशी तळपली की अख्खं स्टेडियम पाहातच राहील.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल च्या 16 व्या सीजनचा पहिला सामना चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध गत विजेत्या गुजरात टायटन यांच्यात खेळवला जात गेला. या सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईच्या संघाने दलंदाजी करताना 20 षटकात 7 विकेट्स घालवून 178 धावा केल्या. या दरम्यान चेन्नईकडून सलामीसाठी आलेला ऋतुराज गायकवाड याने 50 चेंडूत 92 धावांची खेळी केली. परंतु या सामन्यात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते एम एस धोनीच्या एका सिक्सने.
The box office - MS Dhoni's six. pic.twitter.com/p7qd7dKo6d
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 31, 2023
18 व्या षटकात चेन्नईचा स्टार गोलंदाज रवींद्र जडेजा केवळ 1 धाव करून बाद झाल्यावर एम एस धोनी आठव्या स्थानावर मैदानात उतरला. धोनी मैदानात येताच त्याच्या चाहत्यांनी मोठा जल्लोष केला. 20 वे षटक सुरु असताना गुजरात संघाचा गोलंदाज जोशुआ लिटलने एम एस धोनीला चेंडू टाकला. षटकातील तिसऱ्या चेंडूवर धोनीने चेंडू टोलवत सिक्स मारला. धोनीच्या बॅटमधून निघालेला हा सिक्स एवढा जबरदस्त होता की तो 85 मीटर लांब जाऊन पडला. त्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर धोनीने चौकार ठोकला. चेन्नई सुपरकिंग्सने २० षटकात १७८ धावा करून गुजरात टायटनला विजयासाठी १७९ धावांच आव्हान दिल आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, CSK, IPL 2023, MS Dhoni