मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /नो प्लॅन इज प्लॅन! सूर्यकुमारला बाद कसं केलं? मोहितने सांगितली गुजरातची रणनिती

नो प्लॅन इज प्लॅन! सूर्यकुमारला बाद कसं केलं? मोहितने सांगितली गुजरातची रणनिती

सूर्यकुमारला बाद करण्यासाठी खास प्लॅन नव्हता, मोहित शर्माचा खुलासा

सूर्यकुमारला बाद करण्यासाठी खास प्लॅन नव्हता, मोहित शर्माचा खुलासा

सूर्यकुमार आणि तिलक असेपर्यंत सामान आमच्या हातून जातो की काय असं वाटत होतं. सूर्या बाद झाल्यानंतर आम्ही फायनलचा विचार करू शकतो असं वाटल्याचं मोहित शर्मा म्हणाला.

अहमदाबाद, 27 मे : आयपीएलच्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये शुक्रवारी गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सला ६२ धावांनी धूळ चारली. या विजयासह गुजरातने सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक मारलीय. या सामन्यात गुजरातने विजय मिळवला असला तरी सूर्यकुमार जोपर्यंत मैदानात होता तोपर्यंत गुजरातच्या ताफ्यात धडधड सुरू होती. गुजरातविरुद्ध त्याने ३८ चेंडूत ६१ धावा केल्या. यात त्यानं ७ चौकार आणि २ षटकार मारले. सूर्यकुमार यादव बाद होणं हा सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. त्याला बाद करणारा गोलंदाज मोहित शर्मानेसुद्धा ही बाब मान्य केली.

सामन्यानंतर मोहित शर्माने म्हटलं की,"सूर्यकुमार यादवने जर मला सहा सिक्स मारले असते तरी मी माझी बॉलिंग बदलली नसती." मोहित शर्माने या सामन्यात ५ विकेट घेतल्या आणि मुंबईला ऑल आऊट करण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली.

गुजरातच्या विजयानंतर सचिनने गिलला काय सांगितलं? फोटो झाले व्हायरल 

मला इतक्या लवकर विकेट मिळाल्या हे माझं नशीब होतं. गोलंदाजी चांगली होती पण ज्या पद्धतीने सूर्यकुमार आणि तिलक फलंदाजी करत होते ते पाहून आम्हाला वाटलं की सामना हातातून जाऊ शकतो. तेव्हा निर्णय घेतला की सूर्यकुमारला गोलंदाजी करताना त्यात फारसे प्रयोग करायचे नाही असंही मोहितने सांगितलं.

गुजरातच्या संघाने आखलेल्या रणनितीबाबतही मोहित शर्माने सांगितले. तो म्हणाला की, संघाची बैठक झाली तेव्हा आम्ही चर्चा केली, त्याच्याविरुद्ध जास्त प्रयत्न करायला नको. त्यामुळे सूर्यकुमारलाच फायदा होतो. सूर्याविरुद्ध कोणताच प्लॅन नव्हता. लेंथ चेंडू टाकण्याचं ठरलं होतं. इतकंच काय तर षटकार मारले असते तरी फरक पडला नसता. कारण आम्हाला वाटलं की त्याच्यासाठी त्याचे शॉट खेळण्यास सर्वात कठीण लेंथ बॉल आहे.

IPL 2023 : लिलावात मिळाले 50 लाख, एकटा मुंबईवर पडला भारी; 14 चेंडूत फिरवली मॅच

मॅच संपली नव्हती पण सूर्यकुमारची विकेट म्हणजे सामना आमच्या बाजूने आहे असंच होतं. त्याची विकेट घेतल्यानं मोठा दिलासा मिळाला. मला वाटलं आम्ही त्या विकेटनंतर फायनलचा विचार करू शकतो. याआधीही अनेकदा हातात आलेले सामने गमावले आहेत. त्यामुळे मॅच संपेपर्यंत ती संपलेली नसते असंही मोहित शर्मा म्हणाला.

First published:
top videos

    Tags: IPL 2023