जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / MCA Elections : राज्यात विरोधात पण एमसीएमध्ये एकत्र, पवारांच्या पाठिंब्याने शेलार मैदानात!

MCA Elections : राज्यात विरोधात पण एमसीएमध्ये एकत्र, पवारांच्या पाठिंब्याने शेलार मैदानात!

फाईल फोटो

फाईल फोटो

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये एकमेकांचे कट्टर विरोधक एकाच पॅनलमधून रिंगणात उतरले आहेत. एमसीएच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे निवडणूक लढवणार आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 10 ऑक्टोबर : a, मुख्य म्हणजे आशिष शेलार आणि शरद पवार यांचं संयुक्त पॅनल मैदानात उतरलं आहे. आशिष शेलार हे शरद पवारांच्या पॅनलमधून निवडणूक लढत असतानाच मिलिंद नार्वेकर आणि जितेंद्र आव्हाड हेदेखील एमसीएच्या आखाड्यात उतरले आहेत. मंत्री नसलेला आमदार ही निवडणूक लढवू शकतो, त्यामुळे आशिष शेलार अध्यक्षपदाची निवडणूक लढत आहे. तसंच न्यायालयाने वयाची अट घातल्यामुळे शरद पवार निवडणूक लढू शकत नाहीत. मिलिंद नार्वेकर आणि जितेंद्र आव्हाड यांनी अपेक्स काऊन्सीलसाठी स्वतंत्र अर्ज भरला आहे. विहंग सरनाईक यांनी एमपीएल अर्थात मुंबई प्रीमियर लीगसाठी अर्ज दाखल केला आहे. शरद पवार-आशिष शेलार पॅनल

News18

दरम्यान संदीप पाटील यांनी कालच एमसीएच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. संदीप पाटील यांनी अर्ज दाखल करताच त्यांच्याविरुद्ध कॉनफ्लिक्ट ऑफ इंटरेस्टची तक्रार दाखल करण्यात आली. एमसीएच्या घटनेनुसार 38 (व) मध्ये कॉनफ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट म्हणजेच हितसंबंधांबाबतचा मुद्दा येतो. घटनेतील याच नियमाला धरुन मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव संजय नाईक यांनी संदीप पाटील यांच्याविरोधात तक्रार केली आहे. नाईक यांच्या म्हणण्यानुसार संदीप पाटील एमसीए अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून अर्ज करण्यासाठी पात्र ठरु शकत नाहीत. घटनेनुसार त्यांना अपात्र ठरवण्यात यावं अशी मागणी संजय नाईक यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी 13 पानी तक्रार दिली आहे. संजय नाईक यांच्या तक्रारीत असं नमूद करण्यात आलं आहे की, ‘संदीप पाटील आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सिनियर सिलेक्शन कमिटीचे चेअरमन सलील अंकोला यांच्यात जवळचे नातेबसंबंध आहेत. पाटील यांचे अंकोला हे व्याही लागतात. संदीप पाटलांची सून ही सलील अंकोला यांची मुलगी आहे. त्यामुळे एमसीएच्या घटनेतील 38 (व) नियमानुसार संदीप पाटील अध्यक्षपदासाठी अर्ज करु शकत नाहीत’ असं संजय नाईक यांचं म्हणणं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात