नवी दिल्ली, 10 मार्च: टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची(MS Dhoni) पत्नी साक्षी धोनीने (sakshi singh dhoni)लग्नानंतरच्या आयुष्यात होणाऱ्या बदलांवर आपले मत मांडले आहे. क्रिकेटरशी लग्न केल्यानंतर तिचे आयुष्य कसे बदलले हे तिने सांगितले आहे. सीएसकेच्या इतर खेळाडूंच्या पत्नींशी झालेल्या संवादात तिने लग्नानंतरचे साइड-इफेक्टस( mahendra singh dhoni wife sakshi singh dhoni opens up about her experience) सांगितले आहेत. महिली दिना निमित्ता घेण्यात आलेल्या मुलाखतीमध्ये साक्षीने ‘लग्नानंतर सर्व महिलांचे आयुष्य बदलते. इतरांचे नवरे ऑफिसला जातात, पण आमचे नवरे क्रिकेट खेळायला जातात. त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचे दडपण येऊ नये म्हणून त्यांना हव्या त्या पध्दतीने स्वत:ला जुळवून घ्यावे लागते. असा खुलासा साक्षीने यावेळी केला. साक्षीचा हा व्हिडीओ सीएसकेने आपल्या यूट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे. तसेच, कॅमेऱ्यासमोर असताना तुमच्याकडे तुमचा पर्सनल स्पेस नसतो. काही लोक कॅमेऱ्यासमोर सहजतेने वावरु शकतात. काहींना ते जमत नाही. तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत असाल, पण तुम्ही एखाद्या क्रिकेटरची पत्नी आहात, तर लोकही लगेच तुमच्याबद्दल मत बनवतात. असे साक्षीने क्रिकेटर्सशी लग्न केल्यानंतर काय बदल होतात ते सांगितले. यासोबतच, धोनीने आपल्या मेहनतीने शिखर गाठलं. कोट्यवधी लोकांमधून त्याची निवड झाली. भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या खेळाचा तो भाग आहे, याचा अभिमान वाटतो" असेही ती म्हणाली. आयपीएलच्यावेळी चेन्नई सुपर किंग्सला सपोर्ट करताना धोनीसोबत त्याची मुलगी जीवा सुद्धा दिसते. उत्तराखंडमध्ये चार जुलै 2010 रोजी धोनी साक्षीसोबत विवाहबद्ध झाला. धोनी आणि साक्षीचा संसार सुखाने सुरु आहे. धोनीला आयुष्यात साक्षीने महत्त्वाच्या प्रसंगात नेहमीच साथ दिली आहे. सोशल मीडियावर या जोडीचे मोठ्या संख्येने फॉलोअर्स आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.