जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / धोनीच्या बहिणीने त्याच्या मित्रासोबत केलं लग्न, शिक्षिका म्हणून करते काम

धोनीच्या बहिणीने त्याच्या मित्रासोबत केलं लग्न, शिक्षिका म्हणून करते काम

धोनीच्या बहिणीने त्याच्या मित्रासोबत केलं लग्न, शिक्षिका म्हणून करते काम

धोनीच्या करिअरमध्ये त्याची मोठी बहीण जयंती गुप्ताने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. धोनीची बहीण रांचीतील एका पब्लिक स्कूलमध्ये शिक्षिका आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

दिल्ली, 27 जुलै : महेंद्रसिंह धोनी हा भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक म्हणून ओळखला जातो. भारतीय संघाला दोन वर्ल्ड कप जिंकून देणारा धोनी एकमेव कर्णधार आहे. धोनीच्या करिअरमध्ये त्याची मोठी बहीण जयंती गुप्ताने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जयंती गुप्ता धोनीपेक्षा 3-4 वर्षांनी मोठी असून तिने धोनीच्या मित्रासोबत लग्न केलं आहे. क्रिकेटर होण्यासाठी धोनीला जयंती गुप्ताने मदत केली. धोनीच्या वडिलांचा क्रिकेट खेळण्यासाठी विरोध होता. क्रिकेटमध्ये तो जाऊ नये असं त्यांना वाटत होतं. धोनीची बहीण सोशल मीडिया आणि लाइमलाइटपासून दूर राहते. झारखंडमध्येच ती नोकरी करत असून सामान्य जीवन जगत आहे. मोहम्मद सिराज वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे मालिकेतून बाहेर, अचानक मायदेशी परतला धोनीची बहीण रांचीतील एका पब्लिक स्कूलमध्ये शिक्षिका आहे. धोनीचा मित्र गौतम गुप्तासोबत तिने लग्न केलं. धोनीच्या सुरुवातीच्या करिअरमध्ये त्याला राज्य आणि जिल्हा स्तरावर खेळण्यासाठी मदत केली होती. धोनीच्या करिअरला चांगलं बनवण्यासाठी या दोघांनी मोठी भूमिका बजावलीय. एमएस धोनीने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत 90 कसोटी, 350 एकदवसीय आणि 98 टी20 सामने खेळले आहेत. यात त्याने कसोटी 4876, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 10 हजार 773 आणि टी20मध्ये 1617 धावा केल्या आहेत. कसोटी त्याच्या नावावर 6 शतके आणि एका द्विशतकाचा समावेश आहे. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये धोनीने 10 शतके केली आहेत. टी20त त्याने दोन अर्धशतके केली आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: sports
  • First Published :
जाहिरात
जाहिरात