मुंबई, 27 जुलै : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत खेळू शकणार नाही. भारताच्या कसोटी संघात आर अश्विन, अजिंक्य रहाणे, केएस भरत आणि नवदीप सैनी हे होते. ते मायदेशी परतले असून त्यांच्यासोबत मोहम्मद सिराजसुद्धा भारतात आला आहे. एकदिवसीय मालिकेत सिराजची निवड झाली होती, पण त्याला संघ व्यवस्थापनाने अचानक विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. मोहम्मद सिराजने पोर्ट ऑफ स्पेनमध्ये ड्रॉ झालेल्या कसोटीत विकेट घेतल्या होत्या. पहिल्यांदा कसोटीत प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने पटकावला होता. डॉमनिका कसोटीतही त्याने २ विकेट घेतल्या होत्या. तर अश्विनने १५ विकेट घेतल्या होत्या. भारताकडून अश्विननंतर डॉमनिका कसोटीत सिराजने सर्वाधिक विकेट घेतल्या. मोहम्मद शमीला विश्रांती दिल्यानंतर मोहम्मद सिराजकडे वेगवान गोलंदाजीची धुरा सोपवली जाईल असं म्हटलं जात होतं. यात हार्दिक पांड्याशिवाय जयदेव उनादकट, शार्दुल ठाकुर, मुकेश कुमार आणि उम्रान मलिक यांच्या नावांचीही चर्चा होती. मात्र वर्कलोडच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने सिराजला वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय मालिकेतून विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. त्याच्या जागी कोणाला संधी देण्याची घोषणा केलेली नाही. World Cup : वर्ल्ड कपमध्ये भारत-पाक सामन्याची तारीख बदलावी लागणार? वाचा काय आहे कारण भारतात वर्ल्ड कपआधी भारतीय संघाचं शेड्युल व्यस्त आहे. भारतात ऑगस्ट-सप्टेबर दरम्यान आशिया कप स्पर्धा होणार आहे. यानंतर वर्ल्ड कप आधी ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. मोहम्मद सिराज वेस्ट इंडिजविरुद्ध टी२० मालिकेचा भाग नव्हता. दोन कसोटीत त्याने ७ विकेट घेतल्या होत्या. पोर्ट ऑफ स्पेनच्या पाटा खेळपट्टीवर त्याने पहिल्या डावात ५ विकेट घेतल्या होत्या. त्याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ओव्हलवर झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्येही तो होता. त्याने पहिल्या डावात चार विकेट तर दुसऱ्या डावात एक विकेट घेतली होती. त्याने आयपीएल २०२३ मध्ये आरसीबीकडून खेळताना १४ सामन्यात १९ विकेट घेतल्या होत्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.