मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /सोशल मीडियावर ओळख ते घरच्यांविरोधात जाऊन लग्न; का झाला शिखर धवन अन् आयशाच्या Love Story चा शेवट?

सोशल मीडियावर ओळख ते घरच्यांविरोधात जाऊन लग्न; का झाला शिखर धवन अन् आयशाच्या Love Story चा शेवट?

आयशा यांना पहिल्या पतीपासून दोन मुली होत्या आणि त्यांचा घटस्फोट झाला होता. त्यामुळे शिखरने घटस्फोटित महिलेशी (Divorcee Women) लग्न करू नये अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती

आयशा यांना पहिल्या पतीपासून दोन मुली होत्या आणि त्यांचा घटस्फोट झाला होता. त्यामुळे शिखरने घटस्फोटित महिलेशी (Divorcee Women) लग्न करू नये अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती

आयशा यांना पहिल्या पतीपासून दोन मुली होत्या आणि त्यांचा घटस्फोट झाला होता. त्यामुळे शिखरने घटस्फोटित महिलेशी (Divorcee Women) लग्न करू नये अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती

    नवी दिल्ली 09 सप्टेंबर : भारताचा ऑलराउंडर क्रिकेटर शिखर धवन (All Rounder Cricketer Shikhar Dhawan) याने त्याची पत्नी आयशा मुखर्जी (Wife Aiysha Mukherjee) हिला घटस्फोट दिला आहे. शिखर आणि आयशा यांची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली होती आणि 2012 मध्ये शिखरने आपल्या कुटुंबीयांच्या मर्जीविरुद्ध आयशाशी लग्न केलं होतं. आयशा मुखर्जी आणि शिखर धवन यांना एक मुलगा आहे. आयशा यांना पहिल्या पतीपासून दोन मुली होत्या आणि त्यांचा घटस्फोट झाला होता. त्यामुळे शिखरने घटस्फोटित महिलेशी (Divorcee Women) लग्न करू नये अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती पण त्याने वडिलांच्या इच्छेविरुद्ध आयशाशी लग्न केलं होतं. दैनिक भास्करने शिखरच्या घटस्फोटोबाबतचं हे वृत्त दिलं आहे.

    शिखरची पत्नी आयशानी मंगळवारी सोशल मीडिया पोस्टच्या (Social Media Post ) माध्यमातून आपल्या घटस्फोटाची माहिती जाहीर केली. तिनी लिहिलं होतं, ‘माझा एकदा घटस्फोट झाला होता. दुसऱ्यावेळी माझ्या अनेक गोष्टी पणाला लागल्या होत्या. मला बऱ्याच बाबी सिद्ध करायच्या होत्या. अशात माझं दुसरं लग्न (Second Marriage) जेव्हा मोडलं तेव्हा ती परिस्थिती खूपच भयावह होती.’

    Shikhar Dhawan Update : पहिले बायको आणि आता....गब्बरला 24 तासात दोन धक्के

    शिखर धवनने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. पण त्याने आणि त्याच्या पत्नीनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून परस्परांना अनफॉलो केलं आहे. तसंच शिखरनी त्याच्या प्रोफाइलवर टाकलेले आयशा आणि त्याचे फोटो, व्हिडिओ डिलिट केले आहेत.

    शिखरचा घटस्फोट झाल्यामुळे त्याच्या जवळच्या नातेवाईकांना धक्का बसला आहे. त्यापैकी एका नातेवाईकाने नाव न छापण्याच्या अटीवर माहिती दिली. तो म्हणाला,‘आयशा आणि शिखर यांच्या नात्यात गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यापर्यंत सर्व उत्तम चाललं होतं. लॉकडाउन (Lockdown) सुरू झाला तेव्हा शिखरने त्याचा आयशाबरोबरचा फोटो सोशल मीडियावर टाकून सर्वांना घरात राहण्याचं आवाहनही केलं होतं. जानेवारी 2021 पासून त्यांच्या नात्यात अधिक कटूता आली होती. गेल्या सात-आठ महिन्यात ती अधिकच वाढली. त्यांच्यातील वादाचं कारण कुणालाच माहीत नाही. लग्न मोडू नये (Divorce) अशी शिखरची इच्छा होती त्यासाठी त्याने अटोकाट प्रयत्न केले. आयशाने घटस्फोट मागितला मग शिखरने होकार दिला.’

    मुंबईची ट्रेन, वजनाचा त्रास, 6 बॉल 6 सिक्स, सोपा नव्हता शार्दुलचा प्रवास!

    शिखरने याबाबत कोणतीच माहिती जाहीर केलेली नाही. पण आता त्यांचा घटस्फोट झाला आहे. शिखरचं लग्न जरी कुटुंबीयांच्या मनाविरुद्ध झालं असलं तरीही त्यांनी ते नातं नंतर स्वीकारलं होतं. आता मात्र शिखर आणि आयशा विभक्त झाले आहेत.

    First published:

    Tags: Divorce, Shikhar dhavan, Shikhar dhawan