मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Shikhar Dhawan Update : पहिले बायको आणि आता....गब्बरला 24 तासात दोन धक्के

Shikhar Dhawan Update : पहिले बायको आणि आता....गब्बरला 24 तासात दोन धक्के

टी-20 वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय टीमची (T20 World Cup Team India) घोषणा करण्यात आली आहे. या टीममध्ये काही धक्कादायक नावांची एण्ट्री झाली आहे, तर काहींना टीममधून डच्चू देण्यात आला आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 8 सप्टेंबर : टी-20 वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय टीमची (T20 World Cup Team India) घोषणा करण्यात आली आहे. या टीममध्ये काही धक्कादायक नावांची एण्ट्री झाली आहे, तर काहींना टीममधून डच्चू देण्यात आला आहे. आर. अश्विनचं (R Ashwin) भारताच्या मर्यादित ओव्हरच्या टीममध्ये तब्बल चार वर्षांनी पुनरागमन झालं आहे. तर एमएस धोनीची (MS Dhoni) मेटंर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे टीम इंडियाचा ओपनर शिखर धवन (Shikhar Dhawan) याला मात्र मोठा धक्का बसला आहे. टी-20 वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय टीममधून धवनला डच्चू देण्यात आला आहे.

श्रीलंका दौऱ्यासाठी शिखर धवन टीम इंडियाचा कर्णधार होता. टीम इंडियाचे महत्त्वाचे खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे धवनला टीमचं नेतृत्व देण्यात आलं. या दौऱ्यातल्या टी-20 सीरिजमध्ये भारताचा पराभव झाला, तर वनडे सीरिज भारताने जिंकली. टी-20 वर्ल्ड कपआधीचा टीम इंडियाची ही अखेरची टी-20 सीरिज होती. या सीरिजमध्ये टीमचं नेतृत्व केलेल्या खेळाडूलाच वर्ल्ड कपसाठीच्या टीममध्ये न निवडल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

शिखर धवनला मागच्या 24 तासांमध्ये बसलेला हा दुसरा मोठा धक्का आहे. याआधी शिखर धवनचा आयशा मुखर्जीसोबत घटस्फोट झाल्याचं (Shikhar Dhawan Divorce) वृत्त आलं. खुद्द आयशा मुखर्जीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर याबाबतची एक इमोशनल पोस्ट शेयर केली होती.

भारतीय टीम

विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर. अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी

राखीव खेळाडू : श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर

First published: