मुंबई, 20 जानेवारी : क्रिकेट विश्वातील जुन्या सुपरस्टार्सची लिजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धा (Legends League Cricket 2022) आजपासून (गुरुवार) ओमानमध्ये सुरू होत आहे. या स्पर्धेची पहिली लढत भारतीय क्रिकेटपटूंची 'इंडियन महाराज' विरुद्ध अन्य आशियाई खेळाडूंची आशिया लॉयन्स या टीममध्ये होणार आहे. या लढतीपूर्वी इंडियन महाराजला मोठा धक्का बसला आहे. या टीमचा कॅप्टन वीरेंद्र सेहवाग (Virendera Sehwag) वैयक्तिक कारणांमुळे सुरूवातीच्या काही मॅच खेळणार नाही.
सेहवागच्या अनुपस्थितीमध्ये मोहम्मद कैफ (Mohammed Kaif) टीमचं नेतृत्त्व करणार आहे.
सेहवाग पहिल्या दोन मॅच वैयक्तिक कारणामुळे खेळणार नाही, त्याच्या अनुपस्थितीमध्ये मी टीमचं नेतृत्त्व करेल, असे कैफने स्पष्ट केले. भारतीय टीममध्ये युवराज सिंह, हरभजन सिंह, इराफान पठाणसह टीम इंडियाकडून एक काळ गाजवलेल्या दिग्गज निवृत्त खेळाडूंचा समावेश आहे.कैफ या टीमचा व्हाईस कॅप्टन आहे.
आशिया लॉयन्स टीममध्ये शोएब अख्तर, उमर गुल, मोहम्मद हाफिज, मुरलीधरन सनथ जयसूर्या, चामिंडा वास हे प्रमुख खेळाडू असून मिसाबह-उल-हक या टीमचा कॅप्टन असून टीममध्ये पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंचा समावेश आहे.
'वर्ल्ड जायंट्स' ही या स्पर्धेतील तिसरी टीम आहे. या टीमचा कॅप्टन डॅरेन सॅमी आहे. यामध्ये न्यूझीलंडचा माजी कॅप्टन डॅनियल व्हिटोरी, ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर ब्रेट ली, इंग्लंडचा केविन पीटरसन तसेच दक्षिण आफ्रिकेचा लेग स्पिनर इम्रान ताहीर यांचा समावेश आहे. या स्पर्धेत एकूण 7 सामने होणार असून टॉप 2 टीममधील फायनल लढत 29 जानेवारी रोजी होणार आहे.
ICC ODI Team of The Year : टीम इंडियाची पुन्हा निराशा, शेजारच्या देशांचा दबदबा
इंडियन महाराज : वीरेंद्र सेहवाग (कॅप्टन), मोहम्मद कैफ, युवराज सिंह, हरभजन सिंह, इराफान पठाण, युसूफ पठाण, आर.पी,सिंह, प्रग्यान ओझा, नमन ओझा, मनप्रीत गोनी, हेमांग बदानी, वेणूगोपाल राव, मुनाफ पटेल, संजय बांगर, नयन मोंगिया आणि अमित भंडारी
आशिया लॉयन्स : मिसबाह-उल हक (कॅप्टन), सनथ जयसूर्या, मुरलीधरन, शोएब अख्तर, शाहीद आफ्रिदी, शोएब मलिक, चमिंडा वास, मोहम्मद हफीज, असगर अफगान, उपूल थरंगा, तिलकरत्ने दिलशान, उमर गूल, कमरान अकमल, मोहम्मद यूसुफ, नुवान कुलशेखरा, रोमेश कालुविथाराना आणि अझर महमूद.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Virender sehwag