मुंबई, 19 जानेवारी : टीम इंडियाचा माजी ओपनर वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) लीजेंड्स लीग क्रिकेट (Legends League Cricket 2022) या टी20 स्पर्धेत 'इंडियन महाराज' टीमचं नेतृत्त्व करणार आहे. भारताच्या या आक्रमक खेळाडूच्या टीमचा मोहम्मद कैफ व्हाईस कॅप्टन आहे. त्याचबरोबर या टीममध्ये युवराज सिंह (Yuvraj Singh) आणि हरभजन सिंग (Harbhajan Singh) यांचाही समावेश आहे. क्रिकेट फॅन्सना गुरुवारपासून या सर्व दिग्गजांना मैदानात पाहता येणार आहे.
सेहवागच्या टीमची लढत पाकिस्तानचा ऑल राऊंडर शाहिद आफ्रिदीचा (Shahid Afridi) समावेश असलेल्या एशिया लॉयन्स टीमशी होणार आहे. या टीममध्ये शोएब अख्तर, उमर गुल, मोहम्मद हाफिज, सनथ जयसूर्या, चामिंडा वार या दिग्गज खेळाडूंचाही समावेश आहे. मिसाबह-उल-हक या टीमचा कॅप्टन असून टीममध्ये पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंचा समावेश आहे.
'वर्ल्ड जायंट्स' ही या स्पर्धेतील तिसरी टीम आहे. या टीमचा कॅप्टन डॅरेन सॅमी आहे. यामध्ये न्यूझीलंडचा माजी कॅप्टन डॅनियल व्हिटोरी, ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर ब्रेट ली, इंग्लंडचा केविन पीटरसन तसेच दक्षिण आफ्रिकेचा लेग स्पिनर इम्रान ताहीर यांचा समावेश आहे. टीम इंडियाचे माजी हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) या लीगचे संचालक आहेत.
'हे सर्व खेळाडू निवृत्त झाले आहेत. तरही त्यांच्यात क्रिकेट खेळण्याची तीच ओढ कायम आहे. आगामी 10 दिवसांमध्ये या टीम त्यांचं कौशल्य दाखवतील' असा विश्वास रवी शास्त्रींनी व्यक्त केला आहे. इंडिया महाराज विरुद्ध आशिया लॉयन्स टीममधील मॅचनं गुरुवारी ही स्पर्धा सुरू होईल.
श्रीलंकेच्या कॅप्टनचा संघर्ष व्यर्थ, झिम्बाब्वेनं केला खळबळजनक पराभव
इंडियन महाराज टीम : वीरेंद्र सेहवाग (कॅप्टन), मोहम्मद कैफ, युवराज सिंह, हरभजन सिंह, इराफान पठाण, युसूफ पठाण, आर.पी,सिंह, प्रग्यान ओझा, नमन ओझा, मनप्रीत गोनी, हेमांग बदानी, वेणूगोपाल राव, मुनाफ पटेल, संजय बांगर, नयन मोंगिया आणि अमित भंडारी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Shoaib akhtar, Virender sehwag, Yuvraj singh