जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / भारताच्या दिग्गज खेळाडूने जाहीर केली निवृत्ती, चाहत्यांना केलं 'हे' आवाहन

भारताच्या दिग्गज खेळाडूने जाहीर केली निवृत्ती, चाहत्यांना केलं 'हे' आवाहन

भारताच्या दिग्गज खेळाडूने जाहीर केली निवृत्ती, चाहत्यांना केलं 'हे' आवाहन

भारताचा दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेसने त्याच्या कारकिर्दीबद्दल मोठी घोषणा केली आहे. त्याने बुधवारी जाहीर केलं की 2020 हे वर्ष त्याचे प्रोफेशनल सर्किटवरचे शेवटचे वर्ष असेल.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 26 डिसेंबर : भारताचा दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेसने त्याच्या कारकिर्दीबद्दल मोठी घोषणा केली आहे. त्याने बुधवारी जाहीर केलं की 2020 हे वर्ष त्याचे प्रोफेशनल सर्किटवरचे शेवटचे वर्ष असेल. सध्या 46 वर्षांचा असलेला पेस 30 वर्ष टेनिस खेळला. त्याने ट्विटरवरून निवृत्ती घेणार असल्याचं सांगितलं. पेस म्हणाला की, एक प्रोफेशनल टेनिस खेळाडू म्हणून 2020 हे माझं शेवटचं वर्ष असेल असं जाहिर करायचं आहे. पेसने सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं की, मी 2020 चे टेनिस कॅलेंडर पाहत आहे. ज्यामध्ये काही निवडक स्पर्धांमध्ये खेळणार आहे. संघासोबत प्रवास करेन आणि जगभरातील दोस्त आणि चाहत्यांसोबत आनंद साजरा करेन. तुम्ही सर्वजण ज्यांनी मला आज मी जो आहे तो होण्यासाठी प्रेरणा दिली. मला या वर्षात तुम्हा सर्वांचे आभार मानायचे आहेत. मी माझे आई-वडील या दोघांचेही आभार मानतो. दोघांनी मला भारताचं प्रतिनिधित्व करण्याची ताकद दिली. 2020 हे वर्ष माझ्यासाठी भावनिक असणार आहे. मोठ्या बहिणी आणि मुलगी आयना हिचेही आभार. नव्या वर्षात मला तुम्हा सर्वांना माझ्यासोबत बघायचं आहे असंही पेस म्हणाला. चाहत्यांसाठी पेसने एक संदेशही दिला आहे. हॅशटॅग लास्टरोर (OneLastRoar) वापरून तुम्ही तुमचे आवडते क्षण माझ्यासोबत शेअर करण्याचे आवाहनही त्याने केलं आहे.

जाहिरात

लिएंडर पेसने 1996 च्या अटलांटा ऑलिम्पिकमध्ये देशाला कांस्यपदक मिळवून दिलं होतं. 18 ग्रँडस्लॅम जिंकलेला लिएंडर पेस भारताचा सर्वात यशस्वी टेनिसपटू आहे. पेसने डेव्हिस कपच्या दुहेरीमध्ये 44 विजय मिळवले आहेत. गेल्या 19 वर्षांत पहिल्यांदाच आघाडीच्या 100 दुहेरी खेळाडूंमधून तो बाहेर गेला. पेसने डेव्हिस कप सामन्याआधीच निवृत्तीचे संकेत दिले होते. तेव्हा त्याने म्हटलं होतं की, माझा अनुभव माझ्या कामी आला आता पुढचा विचार केला तर संघासाठी ही गोष्ट चांगली असेल की मी आणखी एक वर्षभर खेळायला नको. मी आता जास्त काळ खेळू शकणार नाही. देशासाठी खेळताना मी माझी कारकिर्द जगली. जेव्हा देशाला कोणत्याही सामन्यात माझी गरज पडली तर मी उपलब्ध असेन असं त्याने म्हटलं होतं. मुंबई इंडियन्स संघाला झटका, IPLआधीच ‘या’ खेळाडूची गोलंदाजी शैली ठरली आक्षेपार्ह!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात