कर्णधारपदाच्या मोहापायी क्रिकेटपटूनं निवृत्तीबाबत घेतला धक्कादायक निर्णय

कर्णधारपदाच्या मोहापायी क्रिकेटपटूनं निवृत्तीबाबत घेतला धक्कादायक निर्णय

टी-20चा बादशाह असलेला दिग्गज गोलंदाज मलिंगानं निवृत्तीबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर : क्रिकेटमधून एकदा निवृत्ती जाहीर केल्यानंतर पुन्हा यु-टर्न घेण्याचा नवा ट्रेंण्ड सुरू झाला आहे. याआधी भारताचा अंबाती रायडू, वेस्ट इंडिजचा ड्व्हेन ब्राव्होनं असाच यु-टर्न घेण्याचा निर्णय घेतला होता. आता आणखी एक दिग्गज गोलंदाज निवृत्ती मागे घेण्याच्या विचारात आहे.

श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगानं वर्ल्ड कप 2019नंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. दरम्यान आता मलिंगाचे लक्ष आहे ते ऑस्ट्रेलियामध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपवर. श्रीलंका संघाला टी-20 चॅम्पियन करण्यासाठी मलिंगा उत्सुक आहे, त्यामुळं वर्ल्ड कपनंतर टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय मलिंगा मागे घेऊ शकतो. याबाबत नुकत्याच एका कार्यक्रमात मलिंगानं संकेत दिले. मलिगाने, “माझ्यात आतापर्यंत दोन वर्ष क्रिकेट खेळण्याची तयारी आहे”, असा खुलासाही मलिंगाने केला. त्यामुळं वर्ल्ड कपनंतर मलिंगा निवृत्ती घेण्याचा निर्णय मागे घेऊ शकतो.

वाचा-क्रिकेटमधील नवं वादळ! 4 सामन्याच्या बंदीचा काढला राग; 9 चेंडूत केल्या 46 धावा

तिन्ही फॉरमॅटमध्ये 100पेक्षा जास्त विकेट घेणारा एकमेव गोलंदाज

इएसपीएनला दिलेल्या मुलाखतीत मलिंगाने, “श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (Sri Lanka Board) मला सांगितले आहे की टी-20 वर्ल्ड कपमध्ये संघाचे नेतृत्व मलाच करायचे आहे. पण श्रीलंकेत कधी काय होईल हे तुम्ही सांगू शकत नाही. टी-20मध्ये गोलंदाजांना चार ओव्हर टाकायच्या असतात, त्यामुळं माझी क्षमता बघता मला काही समस्या नाही. एक खेळाडू म्हणून मी आणखी दोन वर्ष नक्कीच क्रिकेट खेळू शकतो”, असे सांगितले. मलिंगा क्रिकेटच्या इतिहासातला असा पहिला गोलंदाज आहे ज्यानं कसोटी, एकदिवसीय आणि टी-20मध्ये 100 विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. तर, टी-20मध्ये 100 विकेट घेणारा एकमेव गोलंदाज आहे.

वाचा-कोण आहे डे-नाईट कसोटीचा बादशहा; सामना पाहण्याआधी जाणून घ्या Records

‘संघाबाहेर राहून कोणी काही शिकत नाही’

एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या मलिंगानं यावेळी श्रीलंकेच्या युवा खेळाडूंना एक मोलाचा सल्ला दिला. मलिंगाच्या मते, “श्रीलंकेला अशा गोलंदाजांची गरज आहे जे चांगली कामगिरी करू शकतात. एक-दीड वर्षात हे होणार नाही. यासाठी कमीत कमी तीन-चार वर्ष लागतील. त्यामुळं संयम बाळगणे महत्त्वाचे आहे”, असे सांगितले. तसेच, मैदानावरचं खेळाडू खरे शिकतात, संघबाहेर राहून त्यांना कोणतीही शिकवण मिळत नाही, असाही सल्ला दिला. युवा खेळाडूंना शिकवण्यासाठी दिग्गज क्रिकेटपटूंनी त्यांच्या जवळ असावे, असेही मलिंगा म्हणाला.

वाचा-IND vs BAN : ऐतिहासिक कसोटी सामन्यात पंचांची होणार अडचण

टी-20चा बादशाह आहे मलिंगा

कर्णधार म्हणून मलिंगाची कामगिरी विशेष चांगली नसली तरी मलिंगा टी-20चा बादशाह आहे. मलिंगाच्या नेतृत्वाखाली श्रीलंका संघानं 10 सामन्यांमध्ये केवळ एक सामना जिंकला आहे. तर एक सामना अनिर्णित राहिला. आठ सामन्यांत संघाला पराभवाचा धक्का बसला. दरम्यान मलिंगानं न्यूझीलंड विरोधात झालेल्या टी-20 सामन्यात केवळ 6 धावा देत 5 विकेट घेतल्या होत्या. यातील 4 विकेट तर त्यानं चार चेंडूत घेतले आहेत. आजही मलिंगाच्या यॉर्करनं फलंदाजांची झोप उडते. सध्या मलिंगा अबू-धाबी होत असलेल्या मराठा अरेबियन संघाकडून खेळत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 20, 2019 01:16 PM IST

ताज्या बातम्या