मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /CWG 2022: लक्ष्य सेनकडून सोनेरी ‘लक्ष्य’ साध्य, भारताला बॅडमिंटनमध्ये दुसरं सुवर्ण

CWG 2022: लक्ष्य सेनकडून सोनेरी ‘लक्ष्य’ साध्य, भारताला बॅडमिंटनमध्ये दुसरं सुवर्ण

लक्ष्य सेन

लक्ष्य सेन

CWG 2022: 20 वर्षांचा लक्ष्य सेन राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारा आजवरचा चौथा पुरुष खेळाडू ठरला आहे. याआधी प्रकाश पदुकोण, सय्यद मोदी, पारुपल्ली कश्यप यांनी राष्ट्रकुलमध्ये सुवर्ण कामगिरी बजावली होती.

बर्मिंगहॅम, 08 ऑगस्ट: बर्मिंगहॅम, 08 ऑगस्ट: भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेननं सनसनाटी विजयाची नोंद करत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीत सुवर्णपदक पटकावलं. लक्ष्य सेननं अंतिम सामन्यात मलेशियाच्या झी यंगचं कडवं आव्हान तिसऱ्या सेटमध्ये मोडीत काढलं. या सामन्यात यंगनं पहिला सेट 21-19 असा जिंकून आघाडी घेतली होती. पण दुसऱ्या सेटमध्ये लक्ष्यनं जोरदार कमबॅक करताना 21-09 अशा फरकानं हा सेट जिंकला. अखेरच्या सेटमध्ये लक्ष्यनं सुरुवातीपासून घेतलेली आघाडी शेवटपर्यंत टिकवली आणि हाही सेट 21-16 असा खिशात घालून सुवर्णपदकाची कमाई केली.

अवघ्या 20 वर्षांचा लक्ष्य सेन राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारा आजवरचा चौथा पुरुष खेळाडू ठरला आहे. याआधी प्रकाश पदुकोण, सय्यद मोदी, पारुपल्ली कश्यप यांनी राष्ट्रकुलमध्ये सुवर्ण कामगिरी बजावली होती. दरम्यान बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समधलं भारताचं हे आजचं दुसरं सुवर्णपदक ठरलं. महिला एकेरीचा अंतिम सामना जिंकून पी. व्ही. सिंधूनंही सुवर्णपदकाची कमाई केली.

हेही वाचा - CWG 2022: पी. व्ही. सिंधूची ‘सुवर्ण’भरारी, राष्ट्रकुल बॅडमिंटनमध्ये विक्रमी गोल्ड

लक्ष्यचं आजवरचं मोठं यश

2018 साली लक्ष्यनं ज्युनियर आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकून अनेकांचं लक्ष्य वेधून घेतलं होतं. तेव्हापासून त्याच्या कामगिरीचा आलेख नेहमीच वरचढ राहिला आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपचं कांस्य आणि आणि थॉमस कपमधी सुवर्णपदकानंतर राष्ट्रकुलचं सोनं हे लक्ष्यच्या कारकीर्दीतलं सर्वात मोठं यश आहे.

सेन कुटुंबाचा बॅडमिंटनचा वारसा

घरातूनच मिळालेला बॅडमिंटनचा समृद्ध वारसा लक्ष्य सेन पुढे चालवत आहे. सेन कुटुंब हे मूळचं उत्तराखंडच्या अलमोरातलं. लक्ष्य सेनचे आजोबा सी. एल. सेन हे बॅडमिंटनमधले एक नावाजलेले खेळाडू होते. त्यांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरच्या अनेक स्पर्धा जिंकल्या होत्या. आजोबांकडून मिळालेला बॅडमिंटनचा हाच वारसा लक्ष्य सेन पुढे चालवत आहे. लक्ष्य सेनचा मोठा भाऊ चिराग सेनही राष्ट्रीय स्तरावरचा बॅडमिंटन खेळाडू आहे. चिरागनं ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिप आणि ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये उपविजेतेपद पटकावलं होतं.

लक्ष्यचे वडील बॅडमिंटन प्रशिक्षक

लक्ष्यचे वडील डी. के. सेन हेही बॅडमिंटनमधले एक मोठे प्रशिक्षक आहेत. सध्या ते भारताचे महान बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांच्या अकादमीत प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. लक्ष्य सेननही वयाच्या चौथ्या वर्षापासूनच वडिलांच्या मार्गदर्शनाखाली बॅडमिंटनचे धडे गिरवण्यास सुरुवात केली होती.

First published:

Tags: Badminton, Sport