मुंबई, 02 एप्रिल : आयपीएल २०२३ मध्ये तिसरा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. या सामन्यात लखनऊने जबरदस्त विजय मिळवला. दिल्लीला ५० धावांनी पराभूत केलं. लखनऊचा फलंदाज काइल मेयर्सने अर्धशतकी खेळी केली. त्याने आयपीएलमधील पदार्पणातच अशी कामगिरी केली. काइल मेयर्सचे वडीलसुद्धा क्रिकेटर होते आणि त्यांनीच काइलला मार्गदर्शन केलं होतं.
काइल मेयर्सच्या वडीलांचे नाव शिर्ले क्लार्क असं होतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शिर्ले यांना खेळता आलं नव्हतं. मात्र प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ते भरपूर खेळले. शिर्ले यांनी त्यांच्या मुलाला स्वत: प्रशिक्षण दिलं होतं. काइलने २०२० मध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल टाकलं. टी२०मध्ये त्याने पदार्पण केलं. २९ नोव्हेंबर २०२० मध्ये न्यूझीलंडकडून त्याने पहिला टी२० सामना खेळला. त्या सामन्यात १४ चेंडूत काइलने २० धावा केल्या होत्या.
Salim Durani : भारताच्या माजी क्रिकेटपटूचं निधन; अफगाणिस्तानमध्ये जन्म, पाकिस्तानात केलेलं वास्तव्य
काइल मेयर्स बार्बाडोसचा आहे. वेस्ट इंडिजच्या अंडर १५ संघात त्याने २००८ मध्ये स्थान मिळवलं. त्याशिवाय २०१० च्या अंडर १९ वर्ल्ड कप संघातही तो होता. मेयर्सने पहिल्यांदा प्रथम श्रेणीतला सामना २०१५ मध्ये खेळला होता. त्यानतंर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही पदार्पण केलं.
काइल मेयर्सने आयपीएल पदार्पणात जबरदस्त अशी खेळी केली. त्याने फक्त ३८ चेंडूत ७३ धावा केल्या. या खेळीत मेयर्सने ७ षटकार आणि २ चौकार मारले. याशिवाय निकोलस पूरननेसुद्धा ३६ धावा काढून संघाच्या धावांचा वेग वाढवला. या दोघांनी लखनऊला मोठी धावसंख्या उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.