Home /News /sport /

‘पंत बडबड करतो आणि राहुल करून दाखवतो’, दिग्गज क्रिकेटपटूने केली ऋषभची मस्करी

‘पंत बडबड करतो आणि राहुल करून दाखवतो’, दिग्गज क्रिकेटपटूने केली ऋषभची मस्करी

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसर्‍या टी -20 सामना भारताने 7 विकेटनं एकतर्फी जिंकला. या सामन्यात संघाचा नायक ठरला केएल राहुल.

    ऑकलंड, 27 जानेवारी : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसर्‍या टी -20 सामना भारताने 7 विकेटनं एकतर्फी जिंकला. भारतीय क्रिकेट संघाने 17.3 षटकांतच न्यूझीलंडने दिलेले 133 धावांचे लक्ष्य गाठले. या सामन्यात संघाचा नायक ठरला केएल राहुल. केएल राहुलनं या सामन्यात 50 चेंडूत 57 धावा केल्या. राहुलला या खेळीमुळं सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. त्यामुळं राहुल सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्याचबरोबर भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनं राहुलचे कौतुक करत पंतची खिल्ली उडवली. वाचा-VIDEO : लोकलच्या लेडीज डब्ब्यात शिरला श्वान, सीटसोडून महिला पळाल्या 'पंत फक्त बोलतो आणि राहुल करून दाखवतो' विरेंद्र सेहवागने क्रिकेट वेबसाइट क्रिकबझ यांच्याशी खास संवाद साधत, केएल राहुलने खेळपट्टीवर आणि परिस्थितीनुसार फलंदाजी केली, तर ऋषभ पंत फक्त म्हणतो की तो परिस्थितीनुसार चांगली फलंदाजी करतो”, असे म्हणत पंतवर टीका केली. तसेच, राहुलचे कौतुक करताना, 'राहुलची चांगली गोष्ट अशी होती की यावेळी त्याने 50 चेंडूत runs 57 धावा केल्या आहेत, त्यापूर्वी त्याने 25 चेंडूत 50 धावा केल्या होत्या. ऋषभ पंत फक्त असे म्हणतात की मी परिस्थितीनुसार खेळतो पण मी असे कधी पाहिले नव्हते. केएल राहुल परिस्थितीनुसार खेळत आहे. पंत यांनी त्यांच्याकडून शिकले पाहिजे. वाचा-'केएल राहुलचं यष्टीरक्षण संघाला महागात पडणार, धोनीचं मौन समजण्यापलिकडे' राहुलमुळे पंतची जागा धोक्यात केएल राहुल सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे, फक्त फलंदाजी नाही तर यष्टीरक्षक म्हणूनही तो चांगली कामगिरी करत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत पंतच्या डोक्याला चेंडू लागल्यामुळं तो जखमी झाला होता, त्यामुळं न्यूझीलंड दौऱ्याला त्याला मुकावे लागले. त्यामुळं राहुल सध्या संघात यष्टीरक्षकाची भुमिका पार पाडत आहे. फलंदाजीबरोबरच केएलची यष्टीरक्षक म्हणूनही कामगिरी चांगली राहिली आहे. गेल्या 5 पैकी 4 टी-20 सामन्यात त्यानं अर्धशतकी खेळी केली आहे. वाचा-यष्टीरक्षक केएल राहुलने रचला इतिहास, धोनी-पंतला टाकलं मागे केएलनं धोनीला टाकलं मागे यष्टीरक्षक केएल राहुलने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. त्याने श्रेयस अय्यरसोबत 86 धावांची भागिदारी केली. अर्धशतकी खेळी करताना केएल राहुलने अशी कामगिरी केली ज्यामुळे पंत आणि धोनीही मागे पडले. केएल राहुलने सलग दोन टी-20 सामन्यात अर्धशतके लगावली. अशी कामगिरी करणारा तो भारताचा पहिलाच यष्टीरक्षक ठरला आहे. केएल राहुलने पहिल्या टी20 सामन्यातही 56 धावांची खेळी केली होती. आतापर्यंत टी-20 मध्ये केएल राहुलने 11 अर्धशतकं केली आहेत. तसेच सलग तीन अर्धशतकं करणारा तो भारताचा तिसरा खेळाडू ठरला आहे. विराटने 2012, 2014 आणि 2014 मध्ये तर रोहितने 2018 मध्ये अशी कामगिरी केली होती. न्यूझीलंडमध्ये दोन टी20 सामन्यात अर्धशतकं करणारा केएल राहुल पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. श्रेयस अय्यर, सुरेश रैना, रोहित शर्मा, युवराज सिंग यांनी न्यूझीलंडमध्ये प्रत्येकी एक अर्धशतक केलं आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या