मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

'आम्हाला ऑस्ट्रेलियाने संधीच दिली नाही' पराभवानंतर किवींचा कर्णधार निराश

'आम्हाला ऑस्ट्रेलियाने संधीच दिली नाही' पराभवानंतर किवींचा कर्णधार निराश

kane williamson

kane williamson

ऑस्ट्रेलियाच्या विजयामुळे न्यूझीलंडचं (AUS vs NZ) व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये वर्ल्ड चॅम्पियन (world championship 2021) होण्याचं स्वप्न पुन्हा एकदा भंग झालं आहे.

    दुबई, 15 नोव्हेंबर: ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडचा (Australia vs New Zealand) 8 विकेट्सनं पराभव करत टी20 वर्ल्ड कप स्पर्धेचं (T20 World Cup 2021) विजेतेपद पटकावलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या विजयामुळे न्यूझीलंडचं व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये वर्ल्ड चॅम्पियन होण्याचं स्वप्न पुन्हा एकदा भंग झालं आहे. गेल्या सहा वर्षांमध्ये तिसऱ्यांदा न्यूझीलंडचा फायनलमध्ये पराभव झाला आहे. या पराभवावर किवींचा कर्णधार केन विल्यमसनने (kane williamson) आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. न्यूझीलंडने दिलेलं 173 रनचं आव्हान ऑस्ट्रेलियाने फक्त दोन विकेट गमावून अगदी सहज पार केलं. मिचेल मार्शने 50 बॉलमध्ये नाबाद 77 रन केले. मार्शच्या या खेळीमध्ये 6 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. तर डेव्हिड वॉर्नर 38 बॉलमध्ये 53 रन करून आऊट झाला. ग्लेन मॅक्सवेल 18 बॉलमध्ये नाबाद 28 रनवर राहिला. या झालेल्या पराभवावर केन विल्यमसन आपली प्रतिक्रीया व्यक्त करत म्हणाला, “आम्हाला वाटले की ही चांगली धावसंख्या आहे. पण ऑस्ट्रेलियाने त्याचा चांगला पाठलाग केला. तो एक उत्कृष्ट संघ आहे. आणि संपूर्ण स्पर्धेत त्यांनी संस्मरणीय कामगिरी केली आहे.” स्कोअर पुरेसा आहे का असे विचारले असता तो म्हणाला, “सांगता येणार नाही. आम्हालाही तसेच वाटले. आम्ही फारसे मागे नव्हतो पण ऑस्ट्रेलियाने आम्हाला संधी दिली नाही. असे असूनही संघाच्या कामगिरीचा मला अभिमान आहे. असे मत विल्यमसनने सामन्यानंतर व्यक्त केले. तसेच, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंच यानेही विजयानंतर आपले मत व्यक्त केले. 'पहिल्यांदा टी-२० विश्वचषक जिंकल्याचा अभिमान वाटतो. संपूर्ण स्पर्धेत संघाने चमकदार कामगिरी केली. खरतरं लोकांनी आम्हला घरी पाठवण्याची तयारी केली होती. पण आम्ही हार मानली नाही आणि शानदार पुनरागमन केले. त्याने शानदार गोलंदाजी करत मोठ्या विकेट्स घेतल्या. मिचेल मार्शने पहिल्याच चेंडूपासून दडपण निर्माण केले. मॅथ्यू वेडने उपांत्य फेरीत मार्कस स्टॉइनिसला कमालिची साथ दिली. यासोबतच, डेव्हिड वॉर्नरनेही आपले मत व्यक्त केले. काही आठवड्यांपूर्वी प्लेइंग इलेव्हनमधून वगळल्यानंतर आयपीएल संघात शानदार पुनरागमन केले. तो म्हणाला, “माझा नेहमीच स्वतःवर विश्वास होता आणि मी मूलभूत गोष्टी मजबूत ठेवत कठीण विकेटवर फलंदाजीचा सराव केला. हा एक उत्तम संघ, उत्तम सपोर्ट स्टाफ आणि जगभरातील अद्भुत समर्थक आहे. आम्हाला नेहमीच त्याच्यासाठी सर्वोत्तम खेळायचे होते आणि आज ते करू शकलो याचा मला आनंद आहे.” अशी भावना त्याने यावेळी व्यक्त केली.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: T20 cricket, T20 league, T20 world cup

    पुढील बातम्या