मुंबई : टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी आहे. टीममघील हुकमी एक्का म्हणून के एल राहुलकडे पाहिलं जातं. आयपीएल 2023 स्पर्धेदरम्यान के एल राहुलला दुखापत झाली आणि त्यानंतर सर्जरीही करण्यात आली. तो मैदानात लवकर यावा यासाठी टीम इंडिया आणि चाहते प्रार्थना करत होते. आता त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आशिया कपमध्ये के एल राहुल टीम इंडियाकडून खेळताना दिसू शकतो. सध्या के एल राहुल आपल्या फिटनेसकडे खूप जास्त लक्ष देत आहे. के एल राहुलचा आजचा 58 वा दिवस आहे. जिथे तो आपल्या फिटनेसवर लक्ष देत असून घाम गाळत आहे. के एलला लवकर मैदानात खेळण्यासाठी परतायचं आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेला अजून दोन महिने बाकी आहेत. यावेळी ही स्पर्धा एकदिवसीय स्वरूपात खेळवली जाणार आहे. यानंतर, 5 ऑक्टोबरपासून एकदिवसीय विश्वचषक सुरू होईल, ज्याचे आयोजन भारत करत आहे. या आयसीसी स्पर्धेपूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे.
श्रेयस अय्यर टीममधून आऊट झाला आहे. तर के एल राहुल फिट होण्याच्या मार्गावर आहे. तो आशिया कप खेळण्याची शक्यता आहे. त्यापाठोपाठ तो वर्ल्ड कपसाठी देखील खेळू शकतो. दुसरीकडे संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादव देखील उत्तम खेळत असल्याने त्यांनाही संधी दिली जाऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. श्रेयस अय्यरच्या पाठीवर शास्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र अजूनही त्याच्या पाठीचं दुखणं थांबलं नाही. मध्ये मध्ये हे दुखणं डोकं वर काढत असल्याने टीम इंडियासमोर अय्यरला घेऊन सध्या टेन्शन आहेच. मात्र के एल राहुल फीट होत असल्याने एक हुकमी एक्का परत टीममध्ये खेळणार असल्याचा आनंदही आहे.