मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /फ्रान्सचे दिग्गज फुटबॉलपटू जस्ट फॉन्टेन यांचे निधन

फ्रान्सचे दिग्गज फुटबॉलपटू जस्ट फॉन्टेन यांचे निधन

फ्रान्सचे दिग्गज फुटबॉलपटू जस्ट फॉन्टेन यांचे निधन

फ्रान्सचे दिग्गज फुटबॉलपटू जस्ट फॉन्टेन यांचे निधन

1958 च्या फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत विक्रमी 13 गोल करणारे फ्रान्सचे फुटबॉलपटू जस्ट फॉन्टेन यांचे बुधवारी 1 मार्च रोजी निधन झाले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 2 मार्च : 1958 च्या फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत विक्रमी 13 गोल करणारे फ्रान्सचे फुटबॉलपटू जस्ट फॉन्टेन यांचे बुधवारी 1 मार्च रोजी निधन झाले. वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले असून ते 89 वर्षांचे होते.

स्वीडन येथे झालेल्या 1958 सालच्या वर्ल्ड कप स्पर्धेत फॉन्टेन यांचा समावेश होता.  अखेरच्या क्षणी फ्रान्सच्या संघात समावेश करण्यात आले होते आणि त्यांनी याच स्पर्धेच्या सहा सामन्यांत त्यांनी 13 गोल करत एका फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत  सर्वाधिक गोलचा विक्रम आपल्या नावे केला होता.  फॉन्टेन यांनी त्यांच्या फुटबॉल कारकीर्दीत एकूण 213 सामन्यांत 200 गोल केले. तर, फ्रान्ससाठी त्यांनी 21 सामन्यांत 30 गोल केले. मात्र काल अखेर त्यांची प्राणज्योत माळवली.

First published:
top videos

    Tags: FIFA, Football, Sports