मुंबई, 26 एप्रिल : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून एकही सामना खेळलेला नाही. दुखापतीने त्रस्त असणारा जोफ्रा आर्चर एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला उपचारासाठी बेल्जियमला गेला होता. त्यामुळे तो मुंबई इंडियन्सकडून खेळू शकला नाही. बेल्जियममध्ये आर्चरने तज्ज्ञांशी चर्चा करून सर्जरीही करून घेतली असल्याची माहिती समोर येत आहे. जोफ्रा आर्चरने 2एप्रिलला आरसीबीविरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण केलं. मात्र एकच सामना खेळल्यानतंर तो दुखापतीमुळे बाहेर पडला होता. यानंतर अनेक सामन्यात तो बाहेरच होता. पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याचा समावेश करण्यात आला होता. यावेळी जोफ्रा आर्चरने 4 षटके गोलंदाजी केली आणि 42 धावा देत एक विकेटही घेतली. मात्र त्यानंतर गुजरात विरुद्धच्या सामन्यातून तो पुन्हा बाहेर झाला. टीम इंडियाला धक्का? आशिया कप आणि वनडे वर्ल्ड कपलासुद्धा ऋषभ पंत मुकण्याची शक्यता आता आर्चरबाबत एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. द टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार जोफ्रा आर्चर ज्या सामन्यावेळी खेळला नाही तेव्हा तो बेल्जियममध्ये होता. तिथे आर्चरवर एक सर्जरी कऱण्यात आली. सर्जरी झाल्यानंतर तो पुन्हा मुंबई इंडियन्सच्या संघात दाखल झाला आहे. दुखापतीने त्रस्त असूनही जोफ्रा आर्चरला मुंबई इंडियन्सने आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये 8 कोटींना संघात घेतलं. दुखापतीमुळे त्या हंगामात तो एकही सामना खेळला नव्हता. यावेळीही तो सतत दुखापतींचा सामना करत आहे. मुंबई इंडियन्सला आर्चरच्या दुखापतीमुळे डबल धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसुद्धा दुखापतीमुळे खेळू शकत नाहीय. त्यातच आर्चरसुद्धा न खेळल्यानं संघाची गोलंदाजी कमकुवत झालीय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







