दिल्ली, 26 एप्रिल : आयपीएलनंतर भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळणार आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघही जाहीर करण्यात आला आहे. तर सप्टेंबर महिन्यात आशिया कप आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एकदिवसीय वर्ल्ड कप होणार आहे. दरम्यान, या मोठ्या स्पर्धांआधी भारतीय संघासाठी एक वाईट बातमी समोर आलीय. अपघातामुळे दुखापत झालेला ऋषभ पंत या स्पर्धांमध्येही खेळण्याची शक्यता कमी आहे. भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंतचा ३० डिसेंबर २०२२ रोजी कार अपघात झाला होता. या अपघातात ऋषभ पंतला गंभीर दुखापत झाली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार पंत सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या आशिया कप आणि ऑक्टोबर नोव्हेंबरला होणाऱ्या एकदिवसीय वर्ल्ड कपमधून बाहेर झाला आहे. पंतच्या पुनरागमनासाठी आणखी काही काळ लागू शकतो. तो जानेवारीपर्यंत मैदानावर परतल्यास लवकर बरा झाला असं मानलं जाईल. सध्या त्याची प्रकृती सुधारत असली तरी फिट होण्यासाठी सात ते आठ महिने लागतील. हार्दिक पांड्या बनला IPLमधला सर्वात यशस्वी कर्णधार; धोनीचा विक्रम मोडला ऋषभ पंत नुकताच दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सच्या काही सामन्यावेळी उपस्थित होता. त्याला कोणाच्याही मदतीशिवाय चालण्यासाठी आणखी काही आठवडे लागतील. अपघातात थोडक्यात बचावलेल्या पंतवर सर्जरी कऱण्यात आली होती. त्यानंतर तो आता बरा होत आहे. त्याला यष्टीरक्षण करण्यास अद्याप वेळ लागू शकतो. सुरुवातीला तो फक्त फलंदाज म्हणून मैदानावर उतरू शकतो. एकदिवसीय वर्ल्ड कप वर्षाच्या अखेरीस भारतात खेळण्यात येणार आहे. भारताने २०१३ नंतर एकही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. त्यामुळे यावेळी तरी भारत जिंकेल अशी अपेक्षा चाहत्यांना आहे. दरम्यान, अशा मोठ्या स्पर्धेत भारतीय संघाला ऋषभ पंतची उणीव भासेल. IPLच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबईवर अशी नामुष्की, खराब गोलंदाजीत संघ टॉपला ऋषभ पंतचा ३० डिसेंबरला पहाटे साडे पाचच्या सुमारास अपघात झाला होता. रुर्कीच्या नारसन बॉर्डरवर हम्मदपूर इथं रेलिंगला त्याची गाडी धडकली होती. त्यानतंर गाडीला आगही लागली. अपघातात पंतला गंभीर दुखापत झाली होती. या घटनेनंतर पंतला रुग्णालायत दाखल करण्यात आलं होतं. त्याच्यावर पुढील उपचार मुंबईत करण्यात आले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.