बंगळुरु, 22 ऑगस्ट**:** आशिया चषकासाठीच्या भारतीय संघात यंदा जसप्रीत बुमराचा समावेश नाही. पाठीच्या दुखापतीमुळे बुमराला आशिया कपमधून माघार घ्यावी लागली होती. भारतासाठी आशिया कपच्या दृष्टीनं हा मोठा धक्का आहे. दुखापतीतून सावरण्यासाठी बुमरा सध्या बंगळुरुतल्या नॅशनल क्रिकेट अकॅडमीत ट्रेनिंग घेतोय. ट्रेनिंगचा हाच व्हिडीओ बुमरानं शेअर केलाय. ‘कुठलाही अडथळा मोठा नसतो…’ बुमराचं फिट होणं ही भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बाब आहे. तो लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करेल. एनसीएतील रिहॅबिलिटेशन दरम्यान जसप्रीत बुमरा त्यासाठी मेहनत घेताना दिसतोय. त्यानं शेअर केलेल्या व्हिडीओत तो हर्डल्स पार करतोय, वेगवेगळे ड्रील्स आणि धावण्याचा सराव करताना दिसत आहे. बुमरानं या व्हिडीओला कॅप्शन दिलंय, ‘कुठलाही अडथळा मोठा नसतो…’
इंग्लंड दौऱ्यात बुमराला दुखापत जुलैमध्ये भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. याच दौऱ्यातील वन डे मालिकेनंतर बुमराला दुखापत झाली होती. त्यामुळे वेस्ट इंडिज मालिकेसाठी त्याला विश्रांती देण्यात आली. त्यानंतर आशिया चषकासाठीच्या संघातूनही त्याला वगळण्यात आलं. हेही वाचा - Asia Cup 2022: विराटला शास्त्रींचा फुल सपोर्ट, म्हणाले ‘सगळ्यांची तोंडं बंद होतील, जर विराटनं…’
विश्वचषकात बुमरा हवाच…
येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं आहे. विश्वचषकासाठीच्या भारतीय संघात बुमरासारखा शिलेदार हवाच. त्यामुळे तो लवकरात लवकर फिट व्हावा हीच अपेक्षा.