मुंबई, 09 जानेवारी : वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह श्रीलंकेविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडला आहे. आठवड्याभरापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियात बुमराहच्या नावाचा समावेश होता. पण आता बुमराहला विश्रांती देण्यात येत असल्याचं सांगत बीसीसीआय़ने युटर्न घेतला आहे. बुमराह दुखापतीतून आता सावरला असला तरी त्याच्याबाबत कोणताही निर्णय घाईने घ्यायचा नाही अशी भूमिका बीसीसीआयची आहे. बुमराह इतर खेळाडूंसोबत गुवाहाटीला पोहोचलेला नाही. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना गुवाहाटीत होणार आहे. हेही वाचा : बुमराह, शमी अन् भुवनेश्वरला टक्कर देतायत 3 तरुण गोलंदाज; वर्ल्ड कप 2023साठी रेस जसप्रित बुमराह सप्टेंबर २०२२ पासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. त्याला पाठीच्या दुखापतीमुळे वर्ल्ड कपमध्येही खेळता आलं नव्हतं. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत त्याने फिटनेसवर काम केलं. एनसीएने फिट ठरवल्यानंतर निवड समितीने त्याला एकदिवसीय मालिकेसाठी संघात घेतलं होतं पण आता अचानक त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जसप्रीत बुमराह न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय आणि टी२० मालिकेत खेळताना दिसू शकतो. या मालिकेची सुरुवात १८ जानेवारीला होणार आहे. यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. जसप्रीत बुमराहचा फिटनेस टीम इंडियासाठी महत्त्वाचा आहे. कारण ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणारी कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी महत्त्वाची आहे. याशिवाय वर्ल्ड कपही असणार आहे. त्यामुळे या दोन्ही महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये बुमराहची भूमिका महत्त्वाची असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







