नवी दिल्ली, 30 जानेवारी : बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शाह (Jay Shah) यांनी शनिवारी आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाचा (ACC) पदभार स्वीकारला. त्यांना नजमुल हसन पापोन यांच्या जागी नियुक्त करण्यात आलं आहे. बीसीसीआय कोषाध्यक्ष अरुण सिंह धूमल यांनी जय शहा यांचं अभिनंदन केलं. त्यांनी ट्वीट करीत म्हटलं की, आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्ष पदावर नियुक्त झाल्याबद्दल जय शाह यांचं अभिनंद. मला विश्वास आहे की, एसीसी आपल्या नेतृत्वमध्ये मोठं य़श संपादन करेल आणि संपूर्ण आशियाई क्षेत्रात क्रिकेट खेळाडूंना फायदा होईल. यशस्वी कार्यकाळासाठी माझ्या शुभेच्छा.
एसीसीकडे आशिया कप टुर्नामेंटचं आयोजन करण्याची जबाबदारी दिली जाते. कोरोना महासाथीमुळे 2020 मध्ये होणारा आशिया कप या वर्षी जूनमध्ये स्थगित करण्यात आलं होतं. पाकिस्तानला सुरुवातीच्या काळात टुर्नामेंटचं यजमानपद हवं होतं, मात्र आता याचं आयोजन श्रीलंका किंवा बांग्लादेशात होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा-Fact Check : पोलार्डच्या गाडीला खरंच भीषण अपघात झाला? जाणून घ्या सत्य
Congratulations @JayShah on taking over as President of Asian Cricket Council. I’m sure ACC will achieve greater heights under ur leadership and the cricketers of the entire Asian region will benefit. My best wishes for a successful tenure. @bcci @SGanguly99 @ShuklaRajiv
— Thakur Arun Singh (@ThakurArunS) January 30, 2021
आशियाई क्रिकेट परिषद एक क्रिकेट संघटना आहे. ज्याची स्थापना 1983 मध्ये झाली होती. या संघटनेचा उद्देश आशियात क्रिकेट या खेळाचा प्रसार व विकास करणे हा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी ) अधीनस्थ परिषद महाद्वीपमधील प्रादेशिक प्रशासकीय संस्था आहे आणि सध्या 25 देश याचे सदस्य आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BCCI, Cricket news