क्रोएशिया, 28 जून : टोकयो ऑलिम्पिक स्पर्धेआधी (Tokyo Olympic) भारतासाठी चांगली बातमी समोर आली आहे. क्रोएशियामध्ये सुरू असलेल्या शूटिंग वर्ल्ड कपमध्ये (Shooting World Cup) राही सरनोबतला (Rahi Sarnobat) सुवर्ण पदक मिळालं आहे. राही सरनोबत महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातली आहे. राहीने 25 मीटर स्पोर्ट्स पिस्टल प्रकारात सुवर्ण कामगिरी केली आहे, यानंतर आता ऑलिम्पिकमध्येही राहीकडून मेडल जिंकण्याची अपेक्षा वाढली आहे. राहीचं या वर्ल्ड कपमधलं हे दुसरं मेडल आहे, याआधी तिने 10 मीटर एयरपिस्टल प्रकारात महिला टीम इव्हेंटमध्ये कांस्य पदक जिंकलं होतं. यंदाच्या शूटिंग वर्ल्ड कपमधलं भारताचं हे पहिलंच सुवर्ण पदक आहे. राहीने 25 मीटर स्पोर्ट्स फायनलमध्ये 39 पॉईंट्स मिळवले, पण वर्ल्ड रेकॉर्ड तोडण्यापासून ती एक पॉईंट मागे राहिली, तर रौप्य पदक जिंकणाऱ्या शूटरपेक्षा राहीला 8 पॉईंट्स जास्त मिळाले.
GOLD!!! 🥇 @SarnobatRahi wins India’s 1st gold of the #osijek #ISSFWorldCup demolishing the finals field in the Women’s 25M Pistol 🔫 @realmanubhaker finishes 7th @WeAreTeamIndia @ISSF_Shooting #shootingworldcup #indianshootingteam pic.twitter.com/wSJQGQ4B6T
— NRAI (@OfficialNRAI) June 28, 2021
शूटिंग वर्ल्ड कपमध्ये भारताला आतापर्यंत 1 सुवर्ण, 1 रौप्य आणि 2 कांस्य पदकं मिळाली आहे. पदकांच्या स्पर्धेत भारत सहाव्या क्रमांकावर आहे. रशिया 4 सुवर्ण, 4 रौप्य आणि 2 कांस्य पदकांसह पहिल्या क्रमांकावर आहे. क्वालिफायिंग राऊंडमध्ये राही दुसरी 25 मीटर स्पोर्ट्स पिस्टल क्वालिफायिंग राऊंडमध्ये राही 591 पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आणि मनू भाकर 588 पॉईंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या, पण मनूला फायनलमध्ये चमक दाखवता आली नाही. ऑलिम्पिकआधी शेवटची स्पर्धा टोकयो ऑलिम्पिकआधी शूटिंगची ही सगळ्यात मोठी आणि अखेरची स्पर्धा आहे. यानंतर खेळाडू ऑलिम्पिकसाठी जपानला रवाना होतील. यावर्षी 23 जुलै ते 8 ऑगस्टपर्यंत ऑलिम्पिक स्पर्धा खेळवली जाणार आहे. टोकयो ऑलिम्पिक मागच्या वर्षीच होणार होतं, पण कोरोना व्हायरसमुळे स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलण्यात आली.