मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

न्यूझीलंडविरुद्ध इशांत शर्माची टीम इंडियात एन्ट्री, युवा खेळाडूचं पदार्पण लांबणार?

न्यूझीलंडविरुद्ध इशांत शर्माची टीम इंडियात एन्ट्री, युवा खेळाडूचं पदार्पण लांबणार?

2018 मध्ये आयपीएल लिलावात त्याला कोणत्याही संघाने विकत घेतले नव्हते. इशांतने भारतीय संघासाठी टी-20 सामनेही कमी खेळलेले आहे. अशा परिस्थितीत तो लवकरच टी -20 स्वरूपाचा निरोप घेऊ शकतो.

2018 मध्ये आयपीएल लिलावात त्याला कोणत्याही संघाने विकत घेतले नव्हते. इशांतने भारतीय संघासाठी टी-20 सामनेही कमी खेळलेले आहे. अशा परिस्थितीत तो लवकरच टी -20 स्वरूपाचा निरोप घेऊ शकतो.

इंडियासाठी एक आनंदाची बातमी असून वेगवान गोलंदाज इशांत शर्मा तंदुरुस्त झाला असल्याची माहिती मिळाली आहे.

  • Published by:  Suraj Yadav
नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी : न्यूझीलंडविरुद्ध टी20 आणि एकदिवसीय मालिकेनंत कसोटी मालिका सुरू होणार आहे. भारतीय संघ कसोटी मालिकेची जोरदार तयारी करत आहे. टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी असून वेगवान गोलंदाज इशांत शर्मा तंदुरुस्त झाला असल्याची माहिती मिळाली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी तो रवान होणार आहे. बेंगळुरुतील नॅशनल क्रिकेट अॅकॅडमीत शनिवारी इशांत शर्माची फिटनेस टेस्ट झाली. यामध्ये इशांत शर्मा पास झाला आहे. रणजी ट्रॉफीत विदर्भाविरुद्ध खेळताना इशांतला दुखापत झाली होती. एमआरआय स्कॅन केल्यानंतर त्याची दुखापत गंभीर असल्याने त्याला न्यूझीलंड दौऱ्यातून माघार घ्यावी लागली होती. मात्र, इशांत शर्मा लवकर तंदुरुस्त झाल्यानंतर त्यानं फिटनेस टेस्टही सहज पास केली. इशांत शर्मा तंदुरुस्त झाल्याने त्याच्या जागी संधी मिळालेल्या खेळाडूचे पदार्पण लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. इशांतच्या जागी नवदीप सैनी न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत संधी मिळाली होती. इशांत शर्मा फिट झाल्याने आता नवदीप सैनीचे पदार्पण लांबणीवर पडू शकते. न्यूझीलंडमध्ये सैनीची कामगिरी चांगली असली तरी अनुभव इशांतच्या पथ्यावर पडेल. चार वेगवान गोलंदाज खेळवण्याचा विचार विराटने केला तर नवदीप सैनी किंवा उमेश यादव यांच्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्यासाठी स्पर्धा असेल. कसोटी क्रिकेटमध्ये इशांत शर्माने 96 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याच्या नावावर 292 बळींची नोंद आहे. न्यूझीलंडमध्ये त्यानं 5 कसोटी खेळताना 23 गडी बाद केले आहेत. गेल्या दोन वर्षात त्याची कामगिरी जबरदस्त आहे. त्याने 15 कसोटीमध्ये 58 बळी घेतले आहेत. वाचा : भारताचा स्टार कॉमेंटेटर खेळणार IPL! धोनीला पुन्हा चॅम्पियन करून घेणार निवृत्ती कसोटी संघ : विराट कोहली, मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋद्धिमान साहा, ऋषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद शमी, नवदीप सैनी आणि इशांत शर्मा. वाचा : 20 किमी पायी चालण्याच्या स्पर्धेत भारतीय खेळाडूने मिळवलं ऑलिम्पिक तिकीट
First published:

पुढील बातम्या