मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

रेसलरला शुभेच्छा देताना इशांत-विहारीची चूक, डिलीट करावं लागलं ट्वीट

रेसलरला शुभेच्छा देताना इशांत-विहारीची चूक, डिलीट करावं लागलं ट्वीट

खेळाचा कुंभमेळा असलेल्या टोकयो ऑलिम्पिकला (Tokyo Olympics 2020) सुरुवात झाली आहे. भारतीय क्रिकेटपटू इशांत शर्मा (Ishant Sharma) आणि हनुमा विहारी (Hanuma Vihari) यांनी मात्र एक मोठी चूक केली आहे.

  • Published by:  Shreyas

लंडन, 25 जुलै : खेळाचा कुंभमेळा असलेल्या टोकयो ऑलिम्पिकला (Tokyo Olympics 2020) सुरुवात झाली आहे. स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंकडून भरघोस पदक जिंकण्याची देशवासीयांना अपेक्षा आहे. भारतीय क्रिकेटपटू इशांत शर्मा (Ishant Sharma) आणि हनुमा विहारी (Hanuma Vihari) यांनी मात्र एक मोठी चूक केली आहे. या दोघांनी प्रिया मलिकला (Priya Malik) टोकयो ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. आपली चूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर या दोघांनी त्यांचं ट्वीट डिलीट केलं.

देशातल्या क्रीडा रसिकांचं लक्ष टोकयोमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक खेळांवर आहे. भारतीय खेळाडू आणि टीम देशासाठी मेडल जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. मीराबाई चानूने (Mirabai Chanu) शनिवारी वेटलिफ्टिंगमध्ये 49 किलो वजनी गटात सिल्व्हर मेडल जिंकलं आणि भारताचं यंदाच्या ऑलिम्पिकमधलं खातं उघडलं. संपूर्ण देशाने या कामगिरीबद्दल तिचं कौतुक केलं आणि तिला शुभेच्छा दिल्या.

रेसलर प्रिया मलिक हिला हंगेरीमध्ये वर्ल्ड कुस्ती चॅम्पियनशीप प्रकारात भारताकडून गोल्ड मेडल मिळालं, पण अनेकांना याबाबत माहिती नव्हतं. प्रियाला टोकयो ऑलिम्पिकमध्येच गोल्ड मेडल मिळाल्याचं अनेकांना वाटलं. इशांत शर्मा आणि हनुमा विहारी यांचाही असाच भ्रम झाला, त्यामुळे त्यांनी प्रियाला टोकयो ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

चूक लक्षात आल्यानंतर दोघांनीही त्यांचं ट्वीट डिलीट केलं, पण तोपर्यंत त्यांच्या ट्वीटचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला होता. इशांत शर्मा आणि हनुमा विहारी सध्या इंग्लंडमध्ये आहेत. आगामी 5 टेस्ट मॅचच्या सीरिजची दोघं तयारी करत आहेत.

4 ऑगस्टपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरुवात होणार आहे. यातल्या पहिल्या सामन्यात इशांत शर्मा आणि हनुमा विहारी अंतिम-11 मध्ये असतील का नाही, याबाबत साशंकता आहे. विहारी अखेरची टेस्ट ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीमध्ये खेळला होता. तर इशांत शर्मा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरला होता.

First published:

Tags: Hanuma vihari, Olympics 2021