जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / शतकांची माळ लावणाऱ्या शुभमनला दोन खेळाडूंनी लगावली होती चापट, जाणून घ्या काय घडलं होतं?

शतकांची माळ लावणाऱ्या शुभमनला दोन खेळाडूंनी लगावली होती चापट, जाणून घ्या काय घडलं होतं?

टी-20 मध्ये शतक झळकवल्यानंतर दोन खेळाडूंनी शुभमनला लगावली होती जोरदार चापट

टी-20 मध्ये शतक झळकवल्यानंतर दोन खेळाडूंनी शुभमनला लगावली होती जोरदार चापट

वन-डे असो वा टेस्ट क्रिकेट आणि त्यानंतर टी-20 मध्येही दमदार कामगिरी करत शुभमनने इंडियन क्रिकेट टीममध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आहे. शुभमनने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. यात टीमच्या इतर दोन खेळाडूंसोबत तो मस्ती करताना दिसत आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 10 फेब्रुवारी : भारताचा स्टार युवा खेळाडू शुभमन गिल सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. त्याने श्रीलंका आणि न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत दमदार खेळी करून एकामागोमाग एक अशी चार शतक ठोकली.  शुभमनला भारतीय क्रिकेटचं भविष्य मानलं जात आहे. त्याचा उत्तम फॉर्म पाहता ऑस्ट्रेलियाच्या सीरिजमध्येही खेळताना तो पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे. शुभमनने विराट कोहलीप्रमाणे आपल्या खेळात कमालीचं सातत्य राखलं आहे. वन-डे असो वा टेस्ट क्रिकेट आणि त्यानंतर टी-20 मध्येही दमदार कामगिरी करत शुभमनने इंडियन क्रिकेट टीममध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आहे. मैदानावर रनांचा पाऊस पडणारा शुभमन मैदानाबाहेरही मित्रांसोबत मस्ती करण्यासाठी ओळखला जातो. तो सोशल मीडियावर बराच अॅक्टिव्ह असतो. तो इन्स्टाग्रामवर नेहमी व्हिडिओ शेअर करत असतो.  शुभमनने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. यात टीमच्या इतर दोन खेळाडूंसोबत तो मस्ती करताना दिसत आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    व्हिडिओत मस्ती करताना दिसले खेळाडू : इंडियन क्रिकेट टीममधील शुभमन आणि ईशान किशन हे दोन खेळाडू नेहमी मस्ती करत असतात. त्या दोघांमध्ये चांगलं बाँडिंग आहे. या दोघांप्रमाणे चहलही नेहमी मस्ती करत असतो. शुभमनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ईशान किशन, शुभमन आणि यजुवेंद्र चहल दिसत आहेत. या व्हिडिओत तिन्ही खेळाडू रोडीज शोमध्ये अॅक्टिंग करत आहेत. ईशान किशन हा गोरिलाप्रमाणे उड्या मारतोय आणि त्यानंतर गिलजवळ जाऊन तो त्याला चापट मारतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

    जाहिरात

    व्हिडिओवर मजेदार प्रतिक्रियांचा पाऊस : शुभमनने शेअर केलेल्या व्हिडिओला पाहून नेटिझन्सनी त्याला चांगलीच पसंती दिली आहे. 16 लाख 66 हजारांपेक्षा अधिक जणांनी या व्हिडिओला पसंती दर्शवली असून, अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. यातील काही जणांनी चहलबद्दल मत व्यक्त केलं आहे. चहल नेहमीच मजेदार व्हिडिओ तयार करत असतो. त्याच्या या टीममध्ये आणखी दोघं सहभागी झाल्याचे एका युजरने म्हटलंय. दमदार खेळीनंतर खेळाडूंची ही मस्ती खरंच भावण्यासारखी असल्याचं काही जणांनी म्हटलंय. अनेक जणांनी कमेंटमध्ये हसणारे इमोजीही टाकले आहेत. शुभमन आणि सारा अली खान यांच्यातील मैत्रीच्या नात्यावरही काही युजर्सनी कमेंट केली आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात