मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Irfan Pathan: इरफान पठाणची नवी इनिंग, तामिळ चित्रपटात झळकला स्विंगचा बादशाह

Irfan Pathan: इरफान पठाणची नवी इनिंग, तामिळ चित्रपटात झळकला स्विंगचा बादशाह

तामिळ चित्रपटात इरफान पठाण

तामिळ चित्रपटात इरफान पठाण

Irfan Pathan: बुधवारी इरफानचा कोब्रा हा सिनेमा रिलीज झाला आहे. त्यामुळे क्रिकेटच्या मैदानात आपल्या स्विंगनं भल्या भल्या फलंदाजांची दांडी गुल करणारा इकरफान आता अभिनयातही आपलं टॅलेंट दाखवत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 1 सप्टेंबर: टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणणं क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. सध्या तो क्रिकेट कॉमेंटेटरच्या भूमिकेत मैदानात दिसतो. पण इरफान पठाणनं त्यासोबतच आणखी एक नवी इनिंग सुरु केली आहे. इरफान एका तामिळ फिल्ममधून  मोठ्या पडद्यावर झळकला आहे. बुधवारी इरफानचा कोब्रा हा सिनेमा रिलीज झाला आहे. त्यामुळे क्रिकेटच्या मैदानात आपल्या स्विंगनं भल्या भल्या फलंदाजांची दांडी गुल करणारा इकरफान आता अभिनयातही आपलं टॅलेंट दाखवत आहे.

इंटरपोल ऑफिसरची भूमिका

भारतीय क्रिकेट संघात असताना इरफानने आपल्या स्विंग गोलंदाजीच्या आणि अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताला अनेक सामने जिंकून दिले आहेत. पण आता तो अभिनयातही आपण कमी नाही हे दाखवून देत आहे. त्याचा ‘कोब्रा’ हा चित्रपट बुधवारी प्रदर्शित झाला आहे. यामध्ये पठाण इंटरपोल अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. बहुप्रतिक्षित चित्रपट तामिळ, तेलुगु आणि कन्नड भाषांमध्ये डब आणि रिलीज झाला आहे.

हेही वाचा - Asia Cup 2022: बांगलादेश-श्रीलंकेसाठी ‘करो या मरो’, कुणाला मिळणार सुपर फोरचं तिकीट?

युसूफकडून कौतुक

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू आणि इरफानचा मोठा भाऊ युसूफ पठाण यानं ट्विटरवर सिनेमाची एक क्लिप शेअर केली आहे. आणि त्या ट्विटमध्ये युसूफनं इरफानचं कौतुक केलं आहे. युसूफ पठाणनं ट्विटमध्ये म्हटलंय की 'क्रिकेटर काय, अभिनेता काय, डान्सर काय, भाऊ काय, मुलगा काय, पिता काय, मार्गदर्शक काय, गड्डू तू खरंच एक ऑल राऊंडर आहेस.

या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन आर. अजय गन्नामुथी यांनी केले आहे. KGF चित्रपट अभिनेत्री श्रीनिधी शेट्टी देखील या चित्रपटात आहे. इरफानने ओडिशाचे मुख्यमंत्री आणि स्कॉटलंडच्या प्रिन्सच्या हत्येचा तपास करण्यासाठी तुर्की इंटरपोल अधिकाऱ्याची भूमिका केली आहे. चित्रपटातील इरफानच्या पात्राचे नाव अस्लन यिलमाझ असं आहे.

First published:

Tags: Movie release, Sports, Yusuf pathan