Home /News /sport /

IPL 2020, MI Schedule: कधी, कोणत्या टीमला टक्कर देणार रोहित शर्माची मुंबई इंडियन्स

IPL 2020, MI Schedule: कधी, कोणत्या टीमला टक्कर देणार रोहित शर्माची मुंबई इंडियन्स

क्वारंटाइन करण्यात आलेले खेळाडू हे केवळ कोव्हिड टेस्ट करण्यासाठी बाहेर येऊ शकता. त्यांना एक रुममध्ये ठेवण्यात येणार आहे.

क्वारंटाइन करण्यात आलेले खेळाडू हे केवळ कोव्हिड टेस्ट करण्यासाठी बाहेर येऊ शकता. त्यांना एक रुममध्ये ठेवण्यात येणार आहे.

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी टीम मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) चेन्‍नई सुपर किंग्‍स (Chennai Super Kings) च्या विरोधात 19 सप्टेंबर रोजी आयपीएलच्या 13 व्या सीजनमध्ये आपल्या अभियानाची सुरुवात करणार आहे.

    नवी दिल्‍ली, 7 सप्टेंबर : आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी टीम मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) चेन्‍नई सुपर किंग्‍स (Chennai Super Kings) च्या विरोधात 19 सप्टेंबर रोजी आयपीएलच्या 13 व्या सीजनमध्ये आपल्या अभियानाची सुरुवात करणार आहे. मुंबई इंडियन्स आपल्या 14 पैकी 13 सामने भारतीय वेळेनुसार सायंकाळी साडे  सात वाजता खेळणार आहे. सनरायजर्स हैद्राबाद विरोधात एक सामना दुपारी साडे तीन वाजता होणार आहे. चार वेळा चॅम्पिअर झालेली मुंबई इंडियन्स चेन्‍नई सुपर किंग्‍सचा सामना केल्यानंतर कलकत्ता नाइट रायडर्स विरोधात उतरेल. मुंबई इंडियन्स आयपीएलच्या इतिसाहासातील सर्वात यशस्वी टीम आहे. मुंबई इंडियन्सने चार वेळा हा किताब मिळवला आहे. मात्र सुरुवातीच्या पहिल्या पाच सीजनमध्ये ही टीम यशस्वी राहिली नव्हती. मुंबई इंडियन्स 2010 मध्ये आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचली मात्र टीमला पहिला किताब 2013 मध्ये मिळाला होता. आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्स  आणि चेन्‍नई सुपर किंग्‍समध्ये एकूण 30 सामने खेळण्यात आले आहे. ज्यामध्ये मुंबईचा पगडा भारी राहिला. मुंबई इंडियन्सने एकूण 18 सामने जिंकले, तर चेन्‍नईने 12 सामन्यांमध्ये यश मिळवलं आहे. यापैकी दोघांनी न्‍यूट्रल वेन्‍यूवर 5-5 सामन्यांमध्ये यश मिळवलं आहे. हे ही वाचा-IPL Kings XI Punjab Schedule: नव्या कर्णधारासह पंजाबने कंबर कसली वाचा मुंबई इंडियन्सचं संपूर्ण शेड्यूल 19 सप्टेंबर - मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्‍नई सुपर किंग्‍स, अबु धाबी 23 सप्टेंबर -  मुंबई इंडियन्स विरुद्ध कलकत्ता नाइट रायडर्स, अबु धाबी 28 सप्टेंबर - मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर, दुबई 1 ऑक्टोबर - मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्‍स इलेव्हन पंजाब, अबु धाबी 4 ऑक्टोबर - मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद, शारजाह 6 ऑक्टोबर -  मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्‍थान रॉयल्‍स, अबु धाबी 11 ऑक्टोबर - मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्‍ली कॅपिटल्‍स, अबु धाबी 16 ऑक्टोबर - मुंबई इंडियन्स विरुद्ध कलकत्ता नाइट रायडर्स, अबु धाबी 18 ऑक्टोबर -  मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्‍स इलेव्हन पंजाब, दुबई 23 ऑक्टोबर -  मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्‍नई सुपर किंग्‍स, शारजाह 25 ऑक्टोबर - मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्‍थान रॉयल्‍स, अबु धाबी 28 ऑक्टोबर - मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर, अबु धाबी 31 ऑक्टोबर - मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्‍ली कॅपिटल्‍स, दुबई 3 नोव्हेंबर - मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद, शारजाह
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या