नवी दिल्ली, 7 सप्टेंबर : आयपीएल (IPL) च्या इतिहासात केवळ तीनच अशा टीम्स आहेत ज्यांनी एकदाही हा किताब जिंकू शकले नाहीत. या तीनही टीममध्ये किंग्स इलेव्हन पंजाब (Kings Eleven Punjab) हीदेखील सामील आहे. नेस वाडिया आणि प्रीति झिंटा ही टीम शेवटपर्यंत दिसते, मात्र अद्याप जिंकू शकलेली नाही. या टीमसाठी वीरेंद्र सेहवागपासून युवराज सिंह सारखे खेळाडू खेळले आहेत, मात्र किताब काही मिळवू शकले नाहीत. यंदाच्या वर्षी टीमचं कर्णधारपद एल राहुल यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर दिग्गज स्पिन गोलंदाज अनिल कुंबळे (Anil Kumble) यांना हेड कोच बनविण्यात आलं आहे. या बदलांच्या धर्तीवर टीमला यश मिळेल अशी अपेक्षा आहे. रविवारी बीसीसीआयने जारी केलेल्या शेड्यूलनुसार किंग्स इलेव्हन पंजाब यांचा सामना दिल्ली कॅपिटल्स यांच्यासोबत होईल. दिल्ली कॅपिटल्सदेखील हा किताब मिळवू शकली नाही. वाचा किंग्स इलेव्हन पंजाबचं संपूर्ण शेड्यूल 20 सप्टेंबर : किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, दुबई 24 सप्टेंबर : किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर, दुबई 27 सप्टेंबर : किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स, शारजाह 01 ऑक्टोबर : किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स, अबुधाबी 04 ऑक्टोबर : किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, दुबई 08 ऑक्टोबर : किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद, दुबई 10 ऑक्टोबर : किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध कलकत्ता नाइट रायडर्स, अबुधाबी 15 ऑक्टोबर : किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर, शारजाह 18 ऑक्टोबर : किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स, दुबई 20 ऑक्टोबर : किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, दुबई 24 ऑक्टोबर : किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद, दुबई 26 ऑक्टोबर : किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध कलकत्ता नाइटरायडर्स, शारजाह 30 ऑक्टोबर : किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स, अबुधाबी 01 नोव्हेंबर : किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, अबुधाबी हे ही वाचा- रोहित शर्मा नाही तर ‘हा’ खेळाडू IPL मध्ये मारू शकतो डबल सेंच्यूरी यूएईमध्ये होणाऱ्या आयपीएल 13 व्या सीजनसाठी बीसीसीआयने रविवारी शेड्यूल जारी केलं आहे. कोरोनाच्या कहरात गेल्या वर्षीचे चॅम्पियन मुंबई इंडियन्स आणि उपविजेते चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये 19 सप्टेंबर रोजी अबुधाबी येथे पहिला सामना खेळला जाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







