Home /News /sport /

IPLच्या एकाही सामन्यात मिळाली नाही संधी, आता 55 चेंडूंमध्ये ठोकल्या 154 धावा

IPLच्या एकाही सामन्यात मिळाली नाही संधी, आता 55 चेंडूंमध्ये ठोकल्या 154 धावा

2019 चा चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्सचा सामना भलताच ऐतिहासिक ठरला. पहिल्यांदा फलंदाजी करून MIने 8 बाद 149 धावा केल्या. नंतर चेन्नईच्या फलंदाजांनी आपल्या संघाचे 8 बाद 147 अशी स्थिती झाली. शेवटच्या चेंडूवर 2 धावा हव्या असताना मलिंगाने एक उत्कृष्ट यॉर्कर टाकून शार्दूल ठाकूरला बाद केले आणि मुंबईने हा सामना एका धावेने जिंकून 2019 चं विजेतेपद पटकावलं.

टी-20 स्पर्धेमधील एका सामन्यात लिनने केवळ 55 बॉलमध्ये 154 धावा केल्या.

    नवी दिल्ली, 1 डिसेंबर : यंदा झालेल्या आयपीएल टी -20 स्पर्धेचे विजेतेपद मुंबई इंडियन्सने पटकावले. परंतु मुंबईने आपल्या संघात ऑस्ट्रेलियाचा सलामी फलंदाज ख्रिस लिन याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी दिली नाही. परंतु आयपीएल संघात संधी न मिळालेल्या लिनने तीन आठवड्यानंतर सर्वांना आपल्या बॅटने प्रत्युत्तर दिले आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड प्रीमियर क्रिकेट टी-20 स्पर्धेमधील एका सामन्यात लिनने केवळ 55 बॉलमध्ये 154 धावा केल्या. यामध्ये त्याने 20 सिक्सदेखील मारले. लिनने या वादळी खेळीमध्ये 20 सिक्सर मारत गोलंदाजांना घाम फोडला. 155 रन्समधील 120 रन्स त्याने केवळ षटकारांच्या मदतीने केले. त्याचबरोबर 5 फोरदेखील मारले. यामुळे 154 रन्समधील 140 रन्स त्याने केवळ सिक्स आणि फोरच्या साहाय्याने केल्या. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याने शेवटचे 115 रन्स केवळ 34 बॉलमध्ये पूर्ण केले. धावांची त्सुनामी लिन याच्या या धडाकेबाज खेळीच्या जोरावर त्याच्या संघाने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावत 226 रन्स केले. त्याच्या या खेळीमध्ये मॅट रेनशॉने त्याला उत्तम साथ दिली. या खेळीमध्ये लिनचा स्ट्राईक रेट हा 338 हून अधिक होता. बिग बॅशचा हिरो आहे लिन ख्रिस लिन याने बिग बॅशच्या इतिहासात आतापर्यंत सर्वांत जास्त 2332 रन्स केले आहेत. ब्रिस्बेन हिट या संघासाठी तो बीबीएलमध्ये खेळतो. 2019 च्या लिलावामध्ये त्याला आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स संघाने बाहेर काढले होते. त्यानंतर युवराज सिंग याने केकेआरवर टीका देखील केली होती. पण त्यानंतर लिलावामध्ये त्याला मुंबई इंडियन्सने खरेदी केले होते.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Cricket, IPL 2020

    पुढील बातम्या