मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL Auction : एकाच खेळाडूवर खर्च केली 85 टक्के रक्कम, आता अशी असणार मुंबई इंडियन्सची पलटण!

IPL Auction : एकाच खेळाडूवर खर्च केली 85 टक्के रक्कम, आता अशी असणार मुंबई इंडियन्सची पलटण!

IPL Auction आयपीएल 2023 चा लिलाव कोच्चीमध्ये पार पडला. या लिलावात आयपीएलमधली सगळ्यात यशस्वी टीम असलेल्या मुंबई इंडियन्सनी त्यांच्याकडे असलेले जवळपास सगळेच पैसे खर्च केले आहेत.

IPL Auction आयपीएल 2023 चा लिलाव कोच्चीमध्ये पार पडला. या लिलावात आयपीएलमधली सगळ्यात यशस्वी टीम असलेल्या मुंबई इंडियन्सनी त्यांच्याकडे असलेले जवळपास सगळेच पैसे खर्च केले आहेत.

IPL Auction आयपीएल 2023 चा लिलाव कोच्चीमध्ये पार पडला. या लिलावात आयपीएलमधली सगळ्यात यशस्वी टीम असलेल्या मुंबई इंडियन्सनी त्यांच्याकडे असलेले जवळपास सगळेच पैसे खर्च केले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kochi [Cochin], India

कोच्ची, 23 डिसेंबर : आयपीएल 2023 चा लिलाव कोच्चीमध्ये पार पडला. या लिलावात आयपीएलमधली सगळ्यात यशस्वी टीम असलेल्या मुंबई इंडियन्सनी त्यांच्याकडे असलेले जवळपास सगळेच पैसे खर्च केले आहेत. आयपीएलच्या मागच्या मोसमात मुंबईची कामगिरी निराशाजनक झाली होती. मुंबई पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या क्रमांकावर राहिली, यानंतर या मोसमासाठी मुंबईने मोठा डाव खेळला.

मुंबई इंडियन्सने लिलावात ऑस्ट्रेलियन ऑलराऊंडर कॅमरून ग्रीन याला 17.50 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं. लिलावात उतरण्याआधी मुंबईकडे 20.55 कोटी रुपये होते, पण त्यांनी एकट्या ग्रीनवरच 85 टक्के रक्कम खर्च केली. कायरन पोलार्डची निवृत्ती आणि हार्दिक पांड्या दुसऱ्या टीममध्ये गेल्यामुळे मुंबईला चांगल्या ऑलराऊंडरची गरज होती, त्यामुळे त्यांनी ग्रीनवर विश्वास दाखवला.

मुंबईने ग्रीनशिवाय ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलर झाय रिचर्डसन यालाही विकत घेतलं. बुमराह आणि आर्चर दुखापतीतून पुनरागमन करत आहेत, त्यामुळे टीमला एका बॅकअप खेळाडूची गरज होती. याशिवाय त्यांनी अनुभवी लेग स्पिनर पियुष चावला यालाही टीममध्ये घेतलं. मुंबईने या लिलावात एकूण 8 खेळाडूंना विकत घेतलं, यात 3 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. टीममध्ये आधीपासूनच 16 खेळाडू आहेत, त्यामुळे त्यांची टीम 24 खेळाडूंची झाली आहे. आयपीएलच्या नियमानुसार एका टीममध्ये जास्तीत जास्त 25 खेळाडू असू शकतात.

IPL Auction : एका तासात बदलला घरातला माहोल, पहिले छप्पर फाड कमाई आणि नंतर...

मुंबईकडे आता फक्त 5 लाख रुपये शिल्लक आहेत, तसंच 8 परदेशी खेळाडूंचा त्यांचा स्लॉटही भरला आहे.

मुंबईने रिटेन केलेले खेळाडू

रोहित शर्मा, जोफ्रा आर्चर, जेसन बेहरनडॉर्फ (ट्रान्सफर), डेवाल्ड ब्रेविस, जसप्रीत बुमराह, टीम डेव्हिड, कुमार कार्तिकेय, अरशद खान, इशान किशन, आकाश मधवाल, ऋतिक शौकीन, रमणदीप सिंग, ट्रिस्टन स्टब्स, तिलक वर्मा, अर्जुन तेंडुलकर, सूर्यकुमार यादव

लिलावात विकत घेतलेले खेळाडू

कॅमरून ग्रीन- 17.5 कोटी

झाय रिचर्डसन- 1.5 कोटी

पियुष चावला- 50 लाख

डाऊन जेनसन- 20 लाख

शम्स मुलानी- 20 लाख

विष्णू विनोद- 20 लाख

नेहाल वाधरे- 20 लाख

राघव गोयल- 20 लाख

First published:

Tags: IPL 2023, IPL auction