मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL Auction : लाहोरचा कलंदर आता हैदराबादचा धुरंदर, करोडपती ब्रुक गर्लफ्रेंडसोबत जगतोय असं आयुष्य

IPL Auction : लाहोरचा कलंदर आता हैदराबादचा धुरंदर, करोडपती ब्रुक गर्लफ्रेंडसोबत जगतोय असं आयुष्य

IPL Auction 2023 : इंग्लंडचा हॅरी ब्रुक झाला करोडपती

IPL Auction 2023 : इंग्लंडचा हॅरी ब्रुक झाला करोडपती

IPL Auction आयपीएल लिलावाच्या पहिल्या राऊंडमध्ये इंग्लंडच्या हॅरी ब्रुकवर सर्वाधिक बोली लागली. इंग्लंडचा खेळाडू असलेला हॅरी ब्रुक त्याच्या वैयक्तिक आयुष्य आणि गर्लफ्रेंडमुळे चर्चेत असतो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kochi [Cochin], India

कोची, 23 डिसेंबर : आयपीएल 2023 च्या लिलावाला कोचीमध्ये सुरूवात झाली आहे. एकूण 87 खेळाडूंवर या लिलावात बोली लागणार आहे. लिलावाच्या पहिल्या राऊंडमध्ये इंग्लंडच्या हॅरी ब्रुकवर सर्वाधिक बोली लागली. सनरायजर्स हैदराबादने ब्रुकवर 13.25 कोटी रुपयांची बोली लावली. ब्रुकची बेस प्राईज 1.50 कोटी रुपये होती. पाकिस्तान सुपर लीगमध्ये हॅरी ब्रुक लाहोर कलंदर्सकडून खेळतो.

नुकत्याच झालेल्या इंग्लंडच्या पाकिस्तान दौऱ्यानंतर हॅरी ब्रुक चर्चेत आला. इंग्लंडने पाकिस्तानचा त्यांच्याच घरात टेस्ट सीरिजमध्ये 3-0 ने पराभव केला. या सीरिजमध्ये हॅरी ब्रुकने पाकिस्तानच्या बॉलिंगची पिसं काढली.

IPL Auction 2023 Live : इंग्लंडच्या सॅम करनवर आयपीएलच्या इतिहासातली सर्वात मोठी बोली

ब्रुकचं वैयक्तिक आयुष्य

क्रिकेटसोबतच हॅरी ब्रुक त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. 2020 पासून ब्रुक त्याची गर्लफ्रेंड लकी लिलीससोबत रिलेशनशीपमध्ये आहे. लकीही तिच्या इन्स्टाग्रामवर हॅरीसोबतचे फोटो शेअर करत असते. लिलीचं इन्स्टाग्राम अकाऊंट प्रायव्हेट असलं तरी ट्विटरवर ती हॅरीसोबतचे बरेच फोटो टाकते. तसंच ब्रुकबाबतच्या पोस्टही रिट्वीट करते.

16 जून 2020 ला लिलीस ब्रुकच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पहिल्यांदा दिसली होती. हॅरी ब्रुकने लिलीससोबतचा सेल्फी सोशल मीडियावर अपलोड करून आपण रिलेशनशीपमध्ये असल्याचं जाहीर केलं होतं.

View this post on Instagram

A post shared by Harry Brook (@harry_brook88)

View this post on Instagram

A post shared by Harry Brook (@harry_brook88)

कोण आहे हॅरी ब्रुक?

इंग्लंडचा क्रिकेटपटू असलेला ब्रुक काऊंटीमध्ये यॉर्कशायरकडून खेळतो. जानेवारी 2022 साली त्याने इंग्लंडकडून पदार्पण केलं. ब्रुकचा जन्म किघलीमध्ये झाला, पण त्याचं लहानपण व्हारफेडलच्या बर्लीमध्येच गेलं. 26 जून 2016 साली त्याने यॉर्कशायरकडून पाकिस्तान ए विरुद्धच्या सामन्यातून पदार्पण केलं. याच्या एका वर्षानंतर 19 जून 2017 ला ब्रुकने मिडलसेक्सविरुद्ध काऊंटी चॅम्पियनशीपमध्ये पहिला सामना खेळला.

First published:

Tags: Ipl 2022 auction