जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL मध्ये बोली नाही, कुठेतरी खेळू द्या! स्टार क्रिकेटपटूचं BCCI ला इमोशनल अपील, VIDEO

IPL मध्ये बोली नाही, कुठेतरी खेळू द्या! स्टार क्रिकेटपटूचं BCCI ला इमोशनल अपील, VIDEO

IPL मध्ये बोली नाही, कुठेतरी खेळू द्या! स्टार क्रिकेटपटूचं BCCI ला इमोशनल अपील, VIDEO

आयपीएल 2022 च्या लिलावात (IPL Auction 2022) खेळाडूंना विकत घेण्यासाठी टीमनी कोट्यावधी रुपये खर्च केले, पण अनेक दिग्गज खेळाडूंवर कोणीच बोली लावली नाही. यातलं सगळ्यात मोठं नाव होतं सुरेश रैना (Suresh Raina) याचं.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 21 फेब्रुवारी : आयपीएल 2022 च्या लिलावात (IPL Auction 2022) खेळाडूंना विकत घेण्यासाठी टीमनी कोट्यावधी रुपये खर्च केले, पण अनेक दिग्गज खेळाडूंवर कोणीच बोली लावली नाही. यातलं सगळ्यात मोठं नाव होतं सुरेश रैना (Suresh Raina) याचं. मिस्टर आयपीएल नावाने लोकप्रिय झालेल्या रैनावर 10 पैकी एकाही टीमने बोली लावली नाही, यानंतर आता रैनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये रैना बीसीसीआयला (BCCI) विनंती करत आहे. रैनाचा हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, याबाबत अजून माहिती मिळू शकलेली नाही. ‘जे खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नाहीत, निदान त्यांना तरी परदेशातल्या लीग खेळायला परवानगी द्यावी. जेव्हा तुम्ही आयपीएल आणि इंटरनॅशनल क्रिकेटमध्येही नाही. आता स्थानिक क्रिकेटमध्येही आंतरराष्ट्रीय दर्जाची कॉम्पिटिशन आहे. जर आम्ही काही महिने क्वालिटी क्रिकेट खेळलो, मग ते CPL असो किंवा BBL, आता आम्ही तयार आहोत, असं वाटेल. बाहेरच्या देशाचे खेळाडू खेळतात आणि मग देशाच्या टीममध्ये पुनरागमन करतात. आमच्यासारख्यांकडे दुसरा कोणताही प्लान नाही,’ असं रैना या व्हिडिओमध्ये म्हणाला आहे.

जाहिरात

आयपीएल 2022 च्या लिलावात रैनावर त्याची जुनी टीम सीएसकेनेही (CSK) बोली लावली नाही. रैनाने त्याची बेस प्राईज 2 कोटी रुपये ठेवली होती. 2008 पासून रैना चेन्नईच्या टीमचा महत्त्वाचा खेळाडू होता. तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करत रैनाने कायमच सीएसकेसाठी संकटमोचकाची भूमिका बजावली. आयपीएल इतिहासात सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंमध्ये रैना चौथ्या क्रमांकावर आहे. 205 सामन्यांमध्ये रैनाने 5,528 रन केले. रैनाच्या पुढे फक्त विराट कोहली, शिखर धवन आणि रोहित शर्मा आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात