जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : 'लॉर्ड' ठाकूर लखनऊकडून खेळणार? राहुलला विचारलं बजेट किती, मिळालं असं उत्तर, VIDEO

IPL 2022 : 'लॉर्ड' ठाकूर लखनऊकडून खेळणार? राहुलला विचारलं बजेट किती, मिळालं असं उत्तर, VIDEO

IPL 2022 : 'लॉर्ड' ठाकूर लखनऊकडून खेळणार? राहुलला विचारलं बजेट किती, मिळालं असं उत्तर, VIDEO

आयपीएल 2022 (IPL Auction 2022) चा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारीला बँगलोरमध्ये होणार आहे. आयपीएलच्या या लिलावासाठी खेळाडूही उत्सुक आहेत. भारताचा फास्ट बॉलर शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) याचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 28 जानेवारी : आयपीएल 2022 (IPL Auction 2022) चा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारीला बँगलोरमध्ये होणार आहे. लिलावाआधी जुन्या 8 टीम आणि नव्या दोन टीमनी त्यांच्या प्रमुख खेळाडूंना रिटेन केलं आहे. आयपीएलच्या या लिलावासाठी खेळाडूही उत्सुक आहेत. भारताचा फास्ट बॉलर शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) याचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये शार्दुल लखनऊ टीमचा कॅप्टन केएल राहुल (KL Rahul) आणि युझवेंद्र चहलसोबत (Yuzvendra Chahal) बसला आहे. या तिघांमध्ये आयपीएल लिलावाबाबत चर्चा सुरू आहे. या व्हिडिओमध्ये शार्दुल ठाकूर लखनऊचा कर्णधार केएल राहुल याला माझ्यासाठी तुमचं बजेट किती आहे? असा प्रश्न विचारतो. यावर राहुल बेस प्राईज असं मजेशीर उत्तर देतो. बाजूला बसलेल्या युझवेंद्र चहलने मात्र देवासाठी बजेट नसतं ब्रो… असं मजेशीर वक्तव्य केलं. शार्दुल ठाकूरला चाहते लॉर्ड शार्दुल नावानेही ओळखतात, यावरूनच चहलने त्याच्यावर निशाणा साधला.

जाहिरात

आयपीएल लिलावासाठी 1214 खेळाडूंनी नावाची नोंदणी केली आहे. यामध्ये 896 भारतीय खेळाडू आहे, तर 318 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. आयपीएल 2022 च्या लिलावामध्ये दोन नव्या टीम लखनऊ आणि अहमदाबादही सहभागी होणार आहेत, म्हणजेच हा लिलाव एकूण 10 टीमसाठी होईल. आयपीएल लिलावासाठी 18 देशांच्या 318 खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाचे 59, दक्षिण आफ्रिकेचे 48, वेस्ट इंडिजचे 41, श्रीलंकेचे 36, इंग्लंडचे 30, न्यूझीलंडचे 29, अफगाणिस्तानचे 20, नेपाळचे 15 आणि अमेरिकेचे 14 खेळाडू आहेत. याशिवाय बांगलादेशचे 9, नामिबियाचे 5, ओमान आणि आयर्लंडचे 3-3, झिम्बाब्वेचे 2, भूटान, नेदरलँड्स आणि स्कॉटलंडचे प्रत्येकी 1-1 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. आयपीएलची प्रत्येक टीम जास्तीत जास्त 25 खेळाडू विकत घेऊ शकते. लिलावाआधी जुन्या 8 टीमनी एकूण 27 खेळाडू रिटेन केले, तर लखनऊ आणि अहमदाबादने प्रत्येकी 3-3 असे 6 खेळाडू विकत घेतले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात