जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : ना मॅक्सवेल ना कार्तिक, RCB 7 कोटींच्या खेळाडूला करणार कॅप्टन!

IPL 2022 : ना मॅक्सवेल ना कार्तिक, RCB 7 कोटींच्या खेळाडूला करणार कॅप्टन!

IPL 2022 : ना मॅक्सवेल ना कार्तिक, RCB 7 कोटींच्या खेळाडूला करणार कॅप्टन!

आयपीएल 2022 चा लिलाव (IPL Auction 2022) शनिवार आणि रविवारी बँगलोरमध्ये पार पडला. या लिलावाच्या तीन दिवसांच्या आतच केकेआरने (KKR) त्यांचा कर्णधार जाहीर केला आहे. केकेआरने ही घोषणा केल्यानंतर लगेचच आता आरसीबी (RCB) त्यांचा कर्णधार जाहीर कधी करणार, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 16 फेब्रुवारी : आयपीएल 2022 चा लिलाव (IPL Auction 2022) शनिवार आणि रविवारी बँगलोरमध्ये पार पडला. या लिलावाच्या तीन दिवसांच्या आतच केकेआरने (KKR) त्यांचा कर्णधार जाहीर केला आहे. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) कोलकात्याचा नवा कर्णधार असेल. केकेआरने ही घोषणा केल्यानंतर लगेचच आता आरसीबी (RCB) त्यांचा कर्णधार जाहीर कधी करणार, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. आयपीएलच्या मागच्या मोसमात विराट कोहलीने (Virat Kohli) आरसीबीच्या कॅप्टन्सीचा राजीनामा दिला. आरसीबीची कॅप्टन्सी सोडली तरी आपण निवृत्त होईपर्यंत याच टीमकडून खेळणार असल्याचं विराटने स्पष्ट केलं होतं. आयपीएलच्या लिलावाआधी आरसीबीने विराट कोहली, ग्लेन मॅक्सेवल (Glenn Maxwell) आणि मोहम्मद सिराजला (Mohammad Siraj) रिटेन केलं, तर लिलावामध्ये दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आणि फाफ डुप्लेसिस (Faf Du Plessis) या अनुभवी खेळाडूंना विकत घेतलं. फाफसाठी आरसीबीने 7 कोटी रुपये खर्च केले. मागच्या मोसमापर्यंत फाफ चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) महत्त्वाचा खेळाडू होता. चेन्नईला मागच्या वर्षी चौथी ट्रॉफी मिळवून देण्यात फाफने मोलाची भूमिका निभावली होती. 2021 आयपीएल फायनलमध्ये फाफने मॅच विनिंग खेळी केली होती. तसंच त्याला दक्षिण आफ्रिकेच्या टीमची कॅप्टन्सी करण्याचाही अनुभव आहे, त्यामुळे फाफला आरसीबीचं नेतृत्व मिळण्याची शक्यता आहे. आरसीबीने फाफसाठी लिलावात एवढा पैसा खर्च केला, त्यामुळे आरसीबी त्यालाच कर्णधार बनवेल, अन्यथा त्याच्यावर इतके पैसे खर्च करण्यात आले नसते, असं मत भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने मांडलं आहे. फाफ डुप्लेसिसचं ओपनर आणि कॅप्टन म्हणून रेकॉर्डही शानदार असल्याचं आकाश चोप्रा म्हणाला. आरसीबीने लिलावामध्ये विकेट कीपर दिनेश कार्तिकला 5.50 कोटी रुपये खर्च करून विकत घेतलं. याआधी कार्तिकने केकेआरचंही नेतृत्व केलं होतं. याशिवाय ग्लेन मॅक्सवेलला टीमने 11 कोटी रुपये देऊन रिटेन केलं. मॅक्सवेल ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्येही कॅप्टन्सी करतो. आरसीबीची टीम विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, फाफ डुप्लेसिस, दिनेश कार्तिक, अनुज रावत, फिन एलन, एल.सिसोदिया, हर्षल पटेल, वानिंदु हसरंगा, शाहबाज अहमद, महिपाल लोमरोर, शेरफेन रदरफोर्ड, सुयश प्रभुदेसाई, अनिश्वर गौतम, डेव्हिड विली, आकाश दीप, जॉस हेजलवूड, जेसन बेहरनडॉर्फ, चामा मिलिंद, कर्ण शर्मा, सिद्धार्थ कौल

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात