जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL Auction 2022 : 'रॉयल आर्मी'मध्ये अश्विन दाखल, अनुभवी स्पिनरवर लागली इतकी बोली

IPL Auction 2022 : 'रॉयल आर्मी'मध्ये अश्विन दाखल, अनुभवी स्पिनरवर लागली इतकी बोली

IPL Auction 2022 : 'रॉयल आर्मी'मध्ये अश्विन दाखल, अनुभवी स्पिनरवर लागली इतकी बोली

भारताच्या मर्यादित ओव्हरच्या टीममध्ये पुनरागमन करणाऱ्या ऑफ स्पिनर आर.अश्विनवर (R Ashwin)आयपीएल लिलावामध्ये (IPL Auction 2022) बोली लागली असून त्याची पुढील टीम निश्चित झाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

बँगलोर, 12 फेब्रुवारी : भारताच्या मर्यादित ओव्हरच्या टीममध्ये पुनरागमन करणाऱ्या ऑफ स्पिनर **आर.अश्विनवर (R Ashwin)**आयपीएल लिलावामध्ये (IPL Auction 2022)  बोली लागली आहे. अश्विनला राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) टीमने 5  कोटी रुपयांना विकत घेतलं आहे. अश्विननं 2010 साली टीम इंडियात पदार्पण केले. तो आयपीएलच्या सुरुवातीपासून 2015 पर्यंत सीएसकेकडे होता. त्याने सीएसकेकडून 94 मॅचमध्ये 90 विकेट्स घेतल्या आहेत. चेन्नईच्या (CSK) टीमवर बंदी आल्यानंतर दोन वर्ष तो रायझिंग पुणे सुपर जायंट्स (Rising Pune Supergiant) या टीमकडून खेळला. त्यानंतरची दोन सिझन पंजाबकडून (Punjab Kings) खेळल्यानंतर आयपीएल 2020 पूर्वी त्याला दिल्लीने (Delhi Captials) खरेदी केले. दिल्लीनं या सिझनमध्ये ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, एनरिक नॉर्किया आणि अक्षर पटेल यांना रिटेन केलं, त्यामुळे अश्विन लिलावामध्ये उतरला. आयपीएलच्या 167 सामन्यांमध्ये अश्विनने 145 विकेट घेतल्या आहेत. तसंच अश्विन तळाला येऊन चांगली बॅटिंगही करतो, त्यामुळे कोणत्याही टीमसाठी अश्विनची ही ऑलराऊंड कामगिरी उपयुक्त ठरते.  या ऑक्शनमध्ये अश्विनला खरेदी करण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) या अश्विनच्या जुन्या टीमने जोरदार प्रयत्न केले. अखेर राजस्थानने या लिलावात बाजी मारली.

जाहिरात

अश्विनची ही चौथी आयपीएल टीम आहे. तो यापूर्वी चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings), पंजाब किंग्ज (Punjab Kings) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) या टीमकडून खेळला आहे. राजस्थानच्या टीममध्ये दाखल झालेला अश्विन हा चौथा खेळाडू आहे. राजस्थाननं यापूर्वी संजू सॅमसन, जोस बटल आणि यशस्वी जैस्वालला खरेदी केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात