जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL Auction 2022 : क्रिकेटपटूचं आयुष्य बदललं, आता वडिलांना बूट पॉलिश आईला बांगड्या विकाव्या लागणार नाहीत!

IPL Auction 2022 : क्रिकेटपटूचं आयुष्य बदललं, आता वडिलांना बूट पॉलिश आईला बांगड्या विकाव्या लागणार नाहीत!

IPL Auction 2022 : क्रिकेटपटूचं आयुष्य बदललं, आता वडिलांना बूट पॉलिश आईला बांगड्या विकाव्या लागणार नाहीत!

आयपीएलच्या 14 वर्षांमध्ये खेळाडू फक्त स्टारच झाले नाहीत तर त्यांचं आयुष्यही बदलून गेलं. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या मालकीची टीम असलेल्या केकेआरने (KKR) आयपीएलच्या या लिलावात (IPL Auction 2022) अशाच एका खेळाडूवर बोली लावली, ज्यामुळे त्याचं नशीबच आता बदलून जाणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 15 फेब्रुवारी : आयपीएलच्या 14 वर्षांमध्ये खेळाडू फक्त स्टारच झाले नाहीत तर त्यांचं आयुष्यही बदलून गेलं. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या मालकीची टीम असलेल्या केकेआरने (KKR) आयपीएलच्या या लिलावात (IPL Auction 2022) अशाच एका खेळाडूवर बोली लावली, ज्यामुळे त्याचं नशीबच आता बदलून जाणार आहे. केकेआरने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नाव कमावलेल्या पंजाबचा खेळाडू रमेश कुमार (Ramesh Kumar) याला 20 लाख रुपयांच्या बेस प्राईजवर विकत घेतलं. टेनिस बॉलने देशातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये क्रिकेट खेळून रमेश कुमारने पैसे कमावले. आता आयपीएल लिलावात बोली लागल्यामुळे रमेशच्या घरात पैसा येणार आहे. रमेशचे वडील बूट पॉलिशचं काम करतात, तर आई गावा-गावांमध्ये जाऊन बांगड्या विकते. आई-वडिलांना आधीही हे काम सोडायला सांगितलं होतं, पण ते ऐकत नव्हते. आता मात्र आयपीएलमध्ये बोली लागल्यानंतर दोघांनीही माझं ऐकलं आहे, अशी प्रतिक्रिया रमेशने दिली. रमेश टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नारायण जलालाबाद या नावाने प्रसिद्ध आहे. रमेश त्याच्या बॅटिंगमुळे युट्यूबवर लोकप्रिय झाला आहे. पीटीआयशी बोलताना रमेशने त्याच्या आई-वडिलांच्या कामाबाबत माहिती दिली. मला आई-वडिलांना हे काम करताना पाहणं बघवत नव्हतं, पण मजबुरी म्हणून त्यांना ही कामं करावी लागत होती, असं रमेश म्हणाला. लिलावामध्ये बोली लागल्यानंतर रमेशला सारखे फोन येत आहेत, तरीही त्याचे पाय जमिनीवर आहेत. आयपीएलमधून मिळणारा पैसा मी छोट्या भावांच्या शिक्षणासाठी खर्च करणार आहे. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली तरच माझं आयुष्य बदलेल, असं वक्तव्य रमेशने केलं. मागच्या वर्षापासून रमेशने लेदर बॉलने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. जिल्हा स्तरावर चांगली कामगिरी केल्यानंतर त्याला पंजाबच्या टीममध्ये रणजी ट्रॉफी शिबिरासाठी बोलावलं. आयपीएलमध्ये नियमित खेळणाऱ्या गुरुकीरत सिंग मानने माझी खूप मदत केली. त्यानेच मला मुंबई आणि केकेआरच्या ट्रायल्सपर्यंत पोहोचवण्यात मदत केली. केकेआरचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर रमेशच्या कामगिरीमुळे प्रभावित झाले आणि त्यांनी लिलावामध्ये त्याला विकत घेतलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात