जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL Auction 2022 : भारतावर प्रश्न उपस्थित करणं पडलं महाग, वर्ल्ड चॅम्पियन खेळाडू अनसोल्ड!

IPL Auction 2022 : भारतावर प्रश्न उपस्थित करणं पडलं महाग, वर्ल्ड चॅम्पियन खेळाडू अनसोल्ड!

IPL Auction 2022 : भारतावर प्रश्न उपस्थित करणं पडलं महाग, वर्ल्ड चॅम्पियन खेळाडू अनसोल्ड!

आयपीएल 2022 च्या लिलावात (IPL Auction 2022) खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला, पण नुकताच टी-20 वर्ल्ड कप जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंवर लिलावात बोली लागली नाही, ज्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

मेलबर्न, 16 फेब्रुवारी : आयपीएल 2022 च्या लिलावात (IPL Auction 2022) खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला. इशान किशन (Ishan Kishan), दीपक चहर (Deepak Chahar), वानिंदु हसरंगा, निकोलस पूरन, लियाम लिव्हिंगस्टोनसह अनेक खेळाडूंना अपेक्षेपेक्षा जास्त पैसे मिळाले. काही अनकॅप खेळाडूंनीही लिलावात मोठी रक्कम मिळवली. सिंगापूरचा टीम डेव्हिड तब्बल 8.25 कोटी रुपयांना विकला गेला, पण नुकताच टी-20 वर्ल्ड कप जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंवर लिलावात बोली लागली नाही, ज्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. ऑस्ट्रेलियाचे फास्ट बॉलर केन रिचर्डसन, एण्ड्रयू टाय आणि लेग स्पिनर एडम झम्पा (Adam Zampa) हे तीन खेळाडू लिलावामध्ये अनसोल्ड राहिले. आयपीएलच्या मागच्या मोसमात भारतातल्या कोरोना व्हायरसच्या भीतीने हे तिन्ही खेळाडू स्पर्धा सोडून ऑस्ट्रेलियात निघून गेले. एवढच नाही तर एडम झम्पा आणि एण्ड्रयू टाय यांनी भारतातला कोरोना आणि कोरोनाला हाताळण्यासाठी भारतात असलेल्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत टीकेचा सूर लावला होता. भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालल्यामुळे आयपीएल स्थगित करण्यात आली होती, पण त्याआधीच हे तिन्ही क्रिकेटपटू भारत सोडून ऑस्ट्रेलियाला परतले होते. आयपीएलचा दुसरा राऊंड अखेर सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात युएईमध्ये खेळवला गेला, तिकडेही या खेळाडूंना संधी मिळाली नाही. मागच्या वर्षी कोरोनाचं कारण देत आयपीएल सोडल्यामुळे मला आणि झम्पाला लिलावात कोणत्याही टीमने विकत घेतलं नाही, हे केन रिचर्डसनने मान्य केलं आहे. झम्पासारख्या खेळाडूसाठी कोणत्याच टीमने बोली लावली नाही, हे पाहून धक्का बसल्याचंही रिचर्डसन म्हणाला. मागच्यावर्षी आयपीएल सोडताना माझं आणि झम्पाचं बोलणं झालं होतं. या निर्णयाचा आपल्याला फटका बसू शकतो, असं माझं आणि झम्पाचं बोलणं झालं होतं, पण तेव्हा आमची प्राथमिकता तिकडे राहणं ही नव्हती. आम्हाला दोघांना ऑस्ट्रेलियात परतायचं होतं. आयपीएल टीम याच कारणामुळे आमच्याबाबत सतर्क झाल्या. हे दोघं परत आले नाहीत तर काय? याचा विचार टीमनी नक्कीच केला असेल. मला तरी हेच कारण वाटतं, अशी प्रतिक्रिया रिचर्डसनने दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात