जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL Auction 2022 : लिलावात झाला मोठा 'ब्लंडर', दिल्लीला मिळाला मुंबईने विकत घेतलेला खेळाडू!

IPL Auction 2022 : लिलावात झाला मोठा 'ब्लंडर', दिल्लीला मिळाला मुंबईने विकत घेतलेला खेळाडू!

IPL Auction 2022 : लिलावात झाला मोठा 'ब्लंडर', दिल्लीला मिळाला मुंबईने विकत घेतलेला खेळाडू!

आयपीएल 2022 च्या लिलावात (IPL Auction 2022) झालेली मोठी चूक आता समोर आली आहे. शनिवार आणि रविवारी बँगलोरमध्ये आयपीएलचा लिलाव पार पडला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 16 फेब्रुवारी : आयपीएल 2022 च्या लिलावात (IPL Auction 2022) झालेली मोठी चूक आता समोर आली आहे. शनिवार आणि रविवारी बँगलोरमध्ये आयपीएलचा लिलाव पार पडला. पहिल्याच दिवशी ऑक्शन घेणारे ह्यूघ एडमिडास लिलाव सुरू असतानाच चक्कर येऊन पडले, त्यामुळे लिलाव काही काळ थांबवण्यात आला. यानंतर चारू शर्मा (Charu Sharma) यांना पुढचा लिलाव घेण्यासाठी बोलावण्यात आलं, पण चारू शर्मा यांनी लिलावामध्ये मोठी चूक केल्याचा आरोप होत आहे. मुंबई इंडियन्सनी (Mumbai Indians) लिलावत विकत घेतलेला खेळाडू चारू शर्मा यांनी दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) विकला. सोशल मीडियावर याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. काय झाली चूक? भारताचा डावखुरा फास्ट बॉलर खलील अहमद (Khaleel Ahmed) याला विकत घेण्यासाठी मुंबई आणि दिल्ली यांच्यात जोरदार चढाओढ सुरू होती. मुंबईने खलील अहमदवर 5.25 कोटी रुपयांची बोली लावली होती. यानंतर चारू शर्मा यांनी दिल्लीला तुम्ही 5.50 कोटी रुपयांची बोली लावणार का? असं विचारलं होतं. दिल्लीसाठी ऑक्शन टेबलवर बसलेल्या किरण कुमार ग्रांधी यांनी बोली लावण्यासाठी अर्धवट पॅडल वर केलं आणि एका सेकंदाच्या आत खाली घेतलं. पेडल खाली घेतल्यावर ग्रांधी यांनी चारू शर्मांना उद्देशून काही वेळ विचार करण्याचा वेळ द्या, असं सांगितलं, यानंतर ग्रांधी ऑक्शन टेबलवर असलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांसोबत चर्चा करू लागले, म्हणजेच दिल्लीने खलीलवर बोली लावली नव्हती.

जाहिरात

मुंबईने खलीलवर कितीची बोली लावली, हे चारू शर्मा विसरले आणि त्यांनी दिल्लीने खलीलवर 5.25 कोटींची बोली लावल्याचं सांगितलं. यानंतर चारू शर्मा यांनी मुंबईला तुम्ही 5.50 कोटी रुपयांची बोली लावणार का? असं विचारलं. मुंबईने यासाठी नकार दिला आणि खलील दिल्लीच्या टीमला 5.25 कोटी रुपयांना मिळाला. मुंबईनेही खलीलसाठी 5.25 कोटी रुपयांचीच बोली लावली होती. चारू शर्मा यांनी खलीलवर बोली लावलेली नसतानाही दिल्लीला विकलं तेदेखील 25 लाख रुपये कमी किंमतीमध्ये, यावरून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात