मुंबई, 17 फेब्रुवारी: इंडियन प्रीमियर लीगचा ( IPL 2021) 14 वा सीझन एप्रिल-मे 2021 मध्ये होणार आहे. पण त्याआधी सर्वाची नजर आहे ती या नव्या सीजनसाठी 18 फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या लिलावावर. या लिलावात 292 खेळाडूंची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. आणि विशेष म्हणजे परवेझ रसूल, मुजताबा युसूफ आणि उमरान मलिक हे तीन जम्मू-काश्मीरचे खेळाडू आपलं स्थान या यादीत पक्क करण्यात यशस्वी ठरले आहेत.
परवेझ रसूल हा ऑलराउंडडर खेळाडू असुन तो जम्मू आणि काश्मीर कडून भारतीय टीम मध्ये खेळणारा पहिला खेळाडू ठरला होता. तो आतापर्यंत इंडिया, इंडिया ए, जम्मू आणि काश्मीर, पुणे वॉरियर्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद एवढ्या संघाकडून खेळला आहे. सर्वात आधी 2014 मध्ये सनरायझर्स हैदराबादने त्याला 94 लाखाची बोली लावून आपल्या संघात घेतलं होत. आयपीएलमध्ये आतापर्यंत त्याने 61 सामने खेळले असुन त्यामध्ये 18.61 च्या सरासरीने 726 धावा काढल्या आहेत तर 29.78 च्या सरासरीने 1489 देवून 50 विकेट घेतल्या आहेत. त्याच्या मागील अनुभवामुळे परवेझ रसूलची लिलावातील बेस प्राईज ही 50 लाख ठेवण्यात आली आहे. (हे वाचा- मुंबई इंडियन्सकडे परतणार ‘भज्जी’? या तीन फ्रेंचायझी बोली लावण्याची शक्यता ) मुजताबा युसूफने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये जम्मू आणि काश्मीर कडून T-20 क्रिकेट मध्ये पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत 2 प्रथम श्रेणी, 4 लिस्ट ए आणि 10 T-20 सामने खेळलेले आहेत. या 2 प्रथम श्रेणी सामन्यात त्याने 19.40 च्या सरासरीने 194 धावा देवून 10 विकेट मिळवल्या तर T-20 सामन्यात 31.12 च्या सरासरीने 249 धावा देत 8 विकेट घेतल्या. गोलंदाजीमध्ये एकूणच त्याचं प्रदर्शन पाहता त्याची बेस प्राईज 20 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. (हे वाचा- अच्छे दिन! विराटशी पंगा घेणाऱ्या मुंबई इंडियंसच्या या खेळाडूला संधी मिळणार? ) उमरान मलिक याने 2020-2021 मध्ये जम्मू आणि काश्मीर संघाकडून रेल्वेविरुद्ध खेळताना सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आपलं पदार्पण केलं. या T-20 सामन्यात त्याने 4 ओव्हरमध्ये 21 धावा देत 1 विकेट मिळवली. त्याची सुद्धा बेस प्राईज 20 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. मलिक हा एक ऑलराउंडडर खेळाडू आहे. आता उद्या होणाऱ्या लिलावात कोण या खेळाडूंवर बोली लावून त्यांना आपल्या संघाकडून खेळण्याची संधी देईल हे पाहणं औत्सुकयाचं ठरणार आहे.