जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 : दारूच्या नशेत धुंद होता युजवेंद्र चहल? गाडीपर्यंत नेण्यासाठीही घ्यावी लागली मदत

IPL 2023 : दारूच्या नशेत धुंद होता युजवेंद्र चहल? गाडीपर्यंत नेण्यासाठीही घ्यावी लागली मदत

दारूच्या नशेत धुंद होता युजवेंद्र चहल? गाडीपर्यंत नेण्यासाठीही घ्यावी लागली मदत

दारूच्या नशेत धुंद होता युजवेंद्र चहल? गाडीपर्यंत नेण्यासाठीही घ्यावी लागली मदत

युजवेंद्र चहल आयपीएल 2023 मध्ये राजस्थान रॉयल्स कडून खेळत असून उत्तम कामगिरी करीत आहे. परंतु एकीकडे युजवेंद्र चहल फॉर्ममध्ये असताना त्याच्या दारूच्या नशेतील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 30 एप्रिल : भारताचा स्टार गोलंदाज युजवेंद्र चहल आयपीएल 2023 मध्ये राजस्थान रॉयल्स कडून खेळत असून सध्या तो आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी करीत आहे. युजवेंद्र चहलने राजस्थानकडून खेळताना 9 सामन्यांमध्ये 12 विकेट्स घेतल्या असून या दरम्यान त्याने एकदा पर्पल कॅप देखील जिंकली आहे. परंतु एकीकडे युजवेंद्र चहल उत्तम फॉर्ममध्ये असताना त्याच्या दारूच्या नशेतील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा 30 एप्रिल रोजी त्याचा 36 वा वाढदिवस साजरा करीत आहे. परंतु या दिवशी राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएलमधील 1000 वा सामना खेळवण्यात येणार असल्याने त्याने 2 दिवसांपूर्वीच आपल्या मित्रांना आणि टीममेट्सना मुंबईतील एका हॉटेलमध्ये वाढदिवसाची पार्टी दिली. या पार्टीला टीम इंडियातील रोहित शर्माचा खास मित्र असलेला  युजवेंद्र चहल देखील उपस्थित होता, सर्वांनी हिटमॅनच्या वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन केले. परंतु या पार्टीतून बाहेर निघतानाच युझी चहलचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

News18लोकमत
News18लोकमत
जाहिरात

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये युजवेंद्र चहल हॉटेलमधून बाहेर निघताना दिसत आहे. यावेळी चहल चालताना काहीसा लडखळत असून थोडा अस्वस्थ दिसतो. तसेच व्हिडिओमध्ये एक व्यक्ती त्याला पकडून गाडीमध्ये नेताना दिसत आहे. हे दृश्य पाहिल्यावर चहल हा दारूच्या नशेत असल्याचा दावा काही युजर्सनी केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात