मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /पाणीपुरी विक्रेता कसा बनला क्रिकेट स्टार? पाहा यशस्वी जैसवालचा प्रेरणादायी प्रवास, Video

पाणीपुरी विक्रेता कसा बनला क्रिकेट स्टार? पाहा यशस्वी जैसवालचा प्रेरणादायी प्रवास, Video

X
IPL

IPL 2023 : ऐकेकाळी आझाद मैदानावर पाणीपुरी विकणारा यशस्वी हा आता मुंबई क्रिकेट टीमचा महत्त्वाचा खेळाडू बनलाय. त्याचा आजवरचा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

IPL 2023 : ऐकेकाळी आझाद मैदानावर पाणीपुरी विकणारा यशस्वी हा आता मुंबई क्रिकेट टीमचा महत्त्वाचा खेळाडू बनलाय. त्याचा आजवरचा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Mumbai, India

  धनंजय दळवी, प्रतिनिधी

  मुंबई, 25 मार्च : गुणवत्ता, इच्छाशक्ती आणि कष्ट करण्याची तयारी असली की यश मिळतंच हे मुंबईच्या यशस्वी जैसवाल यानं दाखवून दिलं आहे. ऐकेकाळी आझाद मैदानावर पाणीपुरी विकणारा यशस्वी हा आता मुंबई क्रिकेट टीमचा महत्त्वाचा खेळाडू बनलाय. राजस्थान रॉयल्सकडून आयपीएल स्पर्धेत खेळणाऱ्या यशस्वीकडं टीम इंडियाचा भावी स्टार म्हणून पाहिलं जात आहे. यशस्वीचा आजवरचा प्रवास कसा होता हे त्याचे शालेय कोच राजू पाठक यांनी उलगडून सांगितलंय.

  आझाद मैदान हेच घर

  उत्तर प्रदेशमधील भदोही या खेड्यातील एका लहान दुकानदाराचा यशस्वी हा मुलगा. क्रिकेटच्या वेडापायी त्यानं वयाच्या 11 व्या वर्षी मुंबई गाठली. या स्वप्ननगरीत त्याला राहण्यासाठी घर नव्हतं. त्यावेळी त्यानं आझाद मैदान हेच आपलं घर मानलं. मोकळं आकाश हेच त्याच्या घराचं छत होतं. क्रिकेट खेळण्याचं ध्येय पूर्ण करण्यासाठी त्यानं कोणतंही काम हलकं मानलं नाही. पोटापाण्यासाठी अगदी पाणीपुरीही विकली.

  यशस्वीच्या या संघर्षात कोच राजू पाठक यांची साथ मोलाची ठरली. त्यांनी यशस्वीच्या गुणवत्तेला न्याय मिळवून दिला. त्याचबरोबर डोक्यावर छप्पर येईल याचीही काळजी घेतली. पाठक यांनी दिलेल्या पाठिंब्यानं यशस्वीचा आत्मविश्वास बळावला आणि त्यानं मुंबई क्रिकेट गाजवायला सुरूवात केली.

  Video : तापानं फणफणत असतानाही पृथ्वी शॉने जिंकून दिली होती मॅच, पाहा Untold Story

  काय आहे कोचची इच्छा?

  'यशस्वी आठवीत असताना ज्वाला सिंग यांनी त्याला माझ्याकडे प्रशिक्षणासाठी आणलं. यापूर्वीही मी त्याचं क्रिकेटपटू म्हणून नाव ऐकलं होतं. अंजूमन इस्लामसाठी खेळणारा आणि आझाद मैदानावर राहाणारा यशस्वी मला माहिती होता. त्याला शिक्षणासाठी बऱ्याच अडचणी सहन कराव्या लागल्या..

  वेळेचं पालन करणारा अतिशय शिस्तप्रिय विद्यार्थी म्हणून तो प्रसिद्ध होता.  तो जमिनीशी नाळ जुळलेला उत्तम बॅटर आहे. त्याच्या बॅटींगच्या जोरावर आम्ही अनेक सामने जिंकले. त्यानं टीम इंडियाचं प्रतिनिधित्व करावं अशी माझी इच्छा आहे,' असं पाठक यांनी सांगितलं.

  यशस्वी जैसवालनं इराणी कपमध्ये घडवला इतिहास

  यशस्वीची आयपीएल कारकिर्द

  2020 मधील अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत जोरदार कामगिरी केल्यानंतर यशस्वीला राजस्थान रॉयल्सनं करारबद्ध केलं. त्यानं आत्तापर्यंत 23 आयपीएल मॅचमध्ये 134.73 च्या स्ट्राईक रेटनं 543 रन केले आहेत. यामध्ये 3 हाफ सेंच्युरींचा समावेश आहे.

  First published:
  top videos

   Tags: Cricket news, IPL 2023, Local18, Mumbai, Rajasthan Royals