जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 PBKS vs GT : 'स्वत:साठी खेळाल तर क्रिकेट तुम्हाला', शुभमन गिलची खेळी पाहून सेहवाग भडकला

IPL 2023 PBKS vs GT : 'स्वत:साठी खेळाल तर क्रिकेट तुम्हाला', शुभमन गिलची खेळी पाहून सेहवाग भडकला

'स्वत:साठी खेळाल तर क्रिकेट तुम्हाला', शुभमन गिलची खेळी पाहून सेहवाग भडकला

'स्वत:साठी खेळाल तर क्रिकेट तुम्हाला', शुभमन गिलची खेळी पाहून सेहवाग भडकला

गुरुवारी पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात जाएंट्स यांच्यात पारपडलेल्या सामन्यात गुजरातने पंजाबवर 6 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात शुभमन गिलचा परफॉर्मन्स पाहून भारताचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहेवाग भडकला.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 14 एप्रिल : आयपीएल 2023 मध्ये 17 वा सामना गुरुवारी पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात जाएंट्स यांच्यात पारपडला. या सामन्यात गुजरातने पंजाबवर 6 विकेट्सने विजय मिळवला, यात शुभमन गिलच्या अर्धशतकीय खेळीचे मोठे योगदान होते. परंतु असे असताना देखील शुभमन गिलच्या सामन्यातील परफॉर्मन्स पाहून भारताचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहेवाग भडकला. पंजाब क्रिकेट असोशिएशनच्या क्रिकेट स्टेडियमवर पारपडलेल्या या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करून गुजरात समोर विजयासाठी 154 धावांच आव्हान ठेवलं. दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुरुवातीला युवा क्रिकेटर शुबमन गिल खूपच धिम्या गतीने फलंदाजी करत होता. त्याने 49 चेंडूत 67 धावा केल्या परंतु त्याच्या धिम्या फलंदाजीमुळेच सामना अखेरच्या ओव्हरपर्यंत पोहचला. यावरूनच वीरेंद्र सेहवागने गिलवर टीका केली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

सेहवागने म्हटले, “जर शुबमन गिल त्याच्या अर्धशतकासाठी खेळला नसता तर सामना लवकर संपला असता. त्याने पॉवरप्लेमध्ये 9 चेंडूत 17 धावा केल्या होत्या. मधल्या काही षटकांमध्ये देखील तो चांगला खेळत होता आणि 22 चेंडूत 35 धावा केल्या होत्या. मात्र, इथपासून अर्धशतक पूर्ण होईपर्यंत त्याने 18 चेंडू खेळले. गिलच्या या खेळीमुळेच सामना अखेरच्या षटकापर्यंत पोहचला.” “शुबमन गिलने 49 चेंडूत 67 धावा केल्या. पण त्याने वैयक्तिक अर्धशतक त्याने 41 किंवा 42 चेंडूत पूर्ण केले. अर्धशतक झाल्यानंतर तो वेगाने खेळू लागला. जर असे झाले नसते तर गुजरातचा संघ शेवटच्या ओव्हरपर्यंत नव्हे तर 17 किंवा अठराव्या ओव्हरमध्येच विजयी झाला असता. जर एखादा खेळाडू संघा पेक्षा वैयक्तिक विक्रमांचा विचार करत असेल तर क्रिकेट हा खेळ असा आहे की भविष्यात त्याला सणसणीत कानाखाली वाजवून  वठणीवर आणतो. तेव्हा युवा खेळाडूंनी वेळीच याचा विचार करावा, " असे वक्तव्य वीरेंद्र सेहवागने केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात