मुंबई, 15 एप्रिल : आज आयपीएल 2023 मध्ये 19 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सुरु आहे. या सामन्यात दिल्लीचा संघ यंदाच्या आयपीएलमध्ये त्यांचं विजयाचं खात उघडण्यासाठी मैदानात उतरला असून आरसीबी संघ होम ग्राऊंडवरील दुसरा सामना जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. अशातच या सामन्यात विराट कोहलीने आयपीएल 2023 मधील त्याच तिसरं अर्धशतकं ठोकलं आहे. आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्मात असून तो सध्या त्याच्या संघासाठी उत्तम कामगिरी करीत आहे. बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना पारपडत असून यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करून दिल्ली समोर विजयासाठी 175 धावांच आव्हान ठेवलं आहे. यावेळी प्रथम फलंदाजी करताना आरसीबीकडून विराटने 34 चेंडूत 50 धावा पूर्ण करून अर्धशतकं ठोकले. विराटने आयपीएल 2023 मध्ये ठोकलेले हे तिसरे अर्धशतकं असून ही तीनही अर्धशतक विराटने आरसीबीचे होम ग्राउंड असलेल्या चिन्नस्वामी स्टेडियमवर केली आहेत.
A king never disappoints his queen❤️❤️ #bleedred #rcb #ViratKohli #kingkohli #ViratKohli𓃵 #IPL2023 #TATAIPL #RCBvDC
— AnOrdinaryViratian (@lordshishimaru) April 15, 2023
@DevgunUjjwal pic.twitter.com/KwhrCnf1ZI
विराटने स्पर्धेतील तिसरे अर्धशतक ठोकल्यानंतर त्याने मैदानावर उत्साहात छाती ठोकून सेलिब्रेशन केले. यावेळी त्याची पत्नी अनुष्का आणि डग आउटमध्ये बसलेल्या आरसीबीच्या संघाने उभं राहून त्याचे अभिनंदन केले. विराटाचे आयपीएल कारकिर्दीतील हे 47 वे शतक होते. यासह विराटने चिन्नस्वामी स्टेडियमवर 2500 धावांचा टप्पा पूर्ण केला. आयपीएल 2023 मध्ये आरसीबीने 3 पैकी एक सामना जिंकला आहे.