मुंबई, 2 जून : भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीचे चाहते जगभरात आहेत. त्याच्या मैदानावरील दमदार खेळीमुळे त्याला चाहत्यांनी किंग कोहली असे नाव दिले असून अनेकांसाठी तो त्यांचा आदर्श आहे. आयपीएल या जगप्रसिद्ध क्रिकेट लीगचा 16 वा सीजन नुकताच पारपडला. यात देखील विराट कोहलीने आपला जबरदस्त परफॉर्मन्स देऊन दोन शतक ठोकली. दरम्यान विराटने सोशल मीडियावर त्याची दहावीची मार्कशीट शेअर केली आहे. विराट कोहली ने ‘कू’ या अँपवरती त्याची दहावीची मार्कशीट शेअर केली आहे. मैदान गाजवणाऱ्या विराटला दहावी इयत्ते मिळालेले मार्क पासून त्याचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. विराट कोहलीच्या समोर आलेल्या मार्कशीटनुसार दहावी इयत्तेत त्याला इंग्रजीमध्ये सर्वाधिक 83 गुण मिळाले होते. त्यानंतर सामाजिक शास्त्रात 81, हिंदीमध्ये 75, प्रास्ताविक आयटीमध्ये 74, विज्ञान आणि तंत्रज्ञानात 55 आणि गणितात 51 गुण मिळाले होते. ही मार्कशीट शेअर करताना विराटने याला मजेशीर कॅप्शन दिले आहे.
काही दिवसांपूर्वी 9 इयत्तेच्या इंग्रजी पेपरमध्ये विराट कोहलीवर निबंध लिहा असा प्रश्न आला होता. त्यानंतर आता विराटच्या 10 वीची मार्कशीट समोर आल्यामुळे याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.