जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 RCB vs RR : मैदानावर पुन्हा पाहायला मिळाला विराट अनुष्काचा रोमॅन्स, Video

IPL 2023 RCB vs RR : मैदानावर पुन्हा पाहायला मिळाला विराट अनुष्काचा रोमॅन्स, Video

मैदानावर पुन्हा पाहायला मिळाला विराट अनुष्काचा रोमॅन्स, Video

मैदानावर पुन्हा पाहायला मिळाला विराट अनुष्काचा रोमॅन्स, Video

आयपीएल 2023 मधील 32 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यादरम्यान मैदानावर आरसीबीचा स्टार खेळाडू विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या दोन लव्ह बर्डसमध्ये रोमॅन्स पाहायला मिळाला.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 23 एप्रिल : आयपीएल 2023 मधील 32 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात आरसीबीने राजस्थान रॉयल्सवर 7 धावांनी विजय मिळवला असून यंदाच्या आयपीएलमधील चौथा सामना जिंकला. या सामन्यादरम्यान मैदानावर आरसीबीचा स्टार खेळाडू विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या दोन लव्ह बर्डसमध्ये रोमॅन्स पाहायला मिळाला. बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर खेळवण्यात आलेलया सामन्यात आरसीबीच्या फलंदाजी दरम्यान विराट कोहलीवर शुन्य धावांवर बाद होण्याची नामुष्की ओढवली. परंतु त्याने फिल्डिंगमध्ये आपले कसब दाखवून राजस्थानच्या दोन फलंदाजांचा झेल पकडत त्यांना बाद केले. 14 वी ओव्हर सुरु असताना विराट कोहलीने राजस्थानकडून धडाकेबाज फलंदाजी करणाऱ्या यशस्वी जयस्वालची कॅच पकडून त्याला बाद केले. विराट कोहलीने यशस्वीची कॅच पकडून विराटने आयपीएलमध्ये 100 झेल पूर्ण केले आणि RCB कडून असा विक्रम करणारा तो पहिला खेळाडू ठरला.

जाहिरात
News18लोकमत
News18लोकमत

या दरम्यान विराट आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यातील एक रोमँटिक मुमेंट कॅमेऱ्यात कैद झाला.  यशस्वीची कॅच घेतल्यानंतर विराटने स्टॅन्डमध्ये बसलेल्या अनुष्काला फ्लाईंग किस दिले. यानिमित्ताने पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर विराट अनुष्काचा रोमॅन्स पाहायला मिळाला असून याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात